‘खेलो इंडिया’ स्पर्धांमुळे भारताला भविष्यात मिळतील दिग्गज खेळाडू

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;



(बर्मिंगहॅम येथे 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये भारतातील खेळाडूंनी विवध क्रीडा प्रकारांमध्ये आपले उत्तमोत्तम प्रतिनिधित्व दाखवून देशातील क्रीडा प्रेमींची मने जिंकली. या राष्ट्रकुल स्पर्धांच्या बाबतीत आकाश बाविस्कर यांनी घेतलेला हा थोडक्यात आढावा.)

आकाश बाविस्कर – ९१३०३४३६५६



 

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या सर्वोत्तम खेळांचे प्रदर्शन करून जगभरातील इतर स्पर्धकांना कडवे आव्हान दिले. काही स्पर्धक यात यथोचित मजल मारून अव्वल ठरलेत, तर काहींनी आपल्या खेळाने क्रीडाप्रेमींचे मन जिंकलीत.

यावर्षीच्या स्पर्धेत वैशिष्ट्य म्हणजे, “खेलो इंडिया” या राष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या स्पर्धेत ज्या खेळाडूंनी आपली चमकदार कामगिरी बजावली होती, त्यानंतर त्यांना इतर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरही सहभागी होता आले, त्यापैकी अनेक युवा खेळाडूंचा यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग भारताच्या चमूत होता. “खेलो इंडिया” सारख्या स्पर्धांच्या आयोजनामुळे भारताला भविष्यात क्रीडा विश्वात अनेक दिग्गज खेळाडू घडवण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे.

हॉकी आणि काही मोजकेच क्रीडाप्रकार सोडता भारताला ऑलिम्पिक मध्ये पदकं नगण्यचं आहेत. सहभागींपैकी काहीच स्पर्धक ऑलिम्पिक पदकांची कमाई करण्यात यशस्वी ठरतात. मात्र त्यातही फार क्वचित सुवर्णपदकाचे मानकरी ठरतात, अगदी बोटावर मोजण्या इतकेच. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे अनेक क्रीडा प्रकारात वर्चस्व आहे. कुस्ती, भरोत्तोलन, शूटिंग, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बॉक्सिंग आदि.

कुस्ती वेटलिफ्टिंग बॅडमिंटन आणि टेबल टेनिस (पॅरा टेबल टेनिससह) मध्ये वैयक्तिक शिस्तबद्ध पदकतालिकेत भारत अव्वल ठरला.  लॉन बॉल प्रकारात महिलांनी प्रथमच सुवर्णपदक तर पुरुषांनी रजत पदक पटकावले. राष्ट्रकुल च्या इतिहासात प्रथमच या क्रीडा प्रकारात दोन्ही संघांनी पदक पटकावण्याची कामगिरी केली आहे. हॉकी मधेही भारतीय पुरुष संघाने रजत तर महिलांनी कांस्य पदक जिंकले आहे. हेही भारतासाठी या स्पर्धेत प्रथमच झाल्याचा दुग्धशर्करा योग आहे.

या वर्षी भारतीय चमूने तब्बल २२ सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले. तर, १६ रजत आणि २३ कांस्य पदकांची कमाई केली. वेटलिफ्टर संकेत सरगर, गुरुराजा पुजारी, बिंदयाराणी देवी आणि मीराबाई चानू यांनी खेळाच्या दुसऱ्या दिवशी भारताचे पदकांचे खाते उघडले होते. तर, बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि सात्विकसाईराज-चिराग शेट्टी आणि टेबल टेनिसमध्ये शरथ कमल यांनी सुवर्णपदक आणि फायनलमध्ये साथियानने टेबल टेनिस मध्ये कांस्य तर पुरुष हॉकी संघाने रौप्यपदक जिंकून स्पर्धेचा शेवट गोड केला.

भारताची राष्ट्रकुल २०२२ स्पर्धेमधील कामगिरी जिंकलेल्या पदकांच्या संख्येनुसार पाचवी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याआधी 2010 मध्ये दिल्ली येथे झालेल्या होम गेम्समध्ये भारताची सर्वोत्तम कामगिरी होती, ज्यात आपल्या चमूने 101 पदके जिंकली होती.

भारताची राष्ट्रकुल स्पर्धेत आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

नवी दिल्ली(२०१०) – १०१ पदके, मँचेस्टर(२००२) – ६९ पदके, गोल्ड कोस्ट(२०१८) – ६६ पदके , ग्लासगो(२०१४) – ६४ पदके, बर्मिंगहॅम(२०२२) – ६१ पदके.

भारताची राष्ट्रकुल २०२२ स्पर्घेत सुवर्णपदकांची संख्या ही आजवरच्या इतिहासातील संयुक्त चौथी सर्वोत्तम कामगिरी आहे.

इतिहासात भारताची सर्वोत्तम सुवर्णपदकं कामगिरी :  नवी दिल्ली(२०१०) – ३८ सुवर्ण पदके, मँचेस्टर(२००२) – ३० सुवर्ण पदके, गोल्ड कोस्ट (२०१८) – २६ सुवर्ण पदके, मेलबर्न (२००६) आणि  बर्मिंगहॅम (२०२२) यात संयुक्तरित्या २२ सुवर्ण पदके.

बर्मिंगहॅम येथे २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या सर्व ६१ पदक विजेत्यांची यादी

ऍथलेटिक्स

एल्डोस पॉल (पुरुषांची तिहेरी उडी – सुवर्ण), अब्दुल्ला अबूबकर (पुरुषांची तिहेरी उडी रौप्य), अविनाश साबळे (पुरुषांची ३००० मीटर स्टीपलचेस रौप्य), प्रियांका गोस्वामी (महिलांची १० किमी शर्यत चालणे रौप्य), एम श्रीशंकर (पुरुषांची तिहेरी उडी-रौप्य), एम. तेजस्वीन शंकर (पुरुषांची उंच उडी – कांस्य), अन्नू राणी (महिला भालाफेक-कांस्य),

संदीप कुमार (पुरुषांची १० किमी शर्यत वॉक-कांस्य)

बॅडमिंटन

पीव्ही सिंधू (महिला एकेरी-सुवर्ण), लक्ष्य सेन (पुरुष एकेरी-सुवर्ण), सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (पुरुष दुहेरी-सुवर्ण), किदाम्बी श्रीकांत, सात्विकसाईराज रंकीरेड्डी, बी सुमीथ रेड्डी, लक्ष्य सेन, चिराग शेट्टी, ए. कश्यप, अश्विनी पोनप्पा, गायत्री गोपीचंद, पीव्ही सिंधू (मिश्र संघ-सिल्व्हर), ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद (महिला दुहेरी-कांस्य), किदाम्बी श्रीकांत (पुरुष एकेरी-कांस्य)

बॉक्सिंग

निखत जरीन (महिलांचे ५० किलो-सुवर्ण), नितू घनघास (महिलांचे ४८ किलो-सुवर्ण), अमित पंघाल (पुरुषांचे ५१ किलो-सुवर्ण), सागर अहलावत (पुरुषांचे +९२ किलो-रौप्य), रोहित टोकस (पुरुषांचे ६७ किलोग्रॅम- कांस्य), रोहित टोकस (पुरुषांचे ६७ किलोग्राम -कांस्य), मोहम्मद हुसामुद्दीन (पुरुष ५७ किलो-कांस्य),

महिला क्रिकेट टीम-रौप्य,

पुरुष हॉकी टीम-रौप्य,  महिला हॉकी टीम-कांस्य

ज्युडो

सुशीला देवी लिकमाबम (महिला 48 किलो-रौप्य), तुलिका मान (महिला +78 किलो-रौप्य), विजय कुमार यादव (पुरुषांचे 60 किलो-कांस्य)

लॉन बाउल महिला संघ-गोल्ड, पुरुष संघ-रौप्य

पॉवरलिफ्टिंग

सुधीर (पुरुषांचे हेवीवेट-गोल्ड)

स्क्वॅश

सौरव घोषाल (पुरुष एकेरी-कांस्य), दीपिका पल्लीकल कार्तिक आणि सौरव घोषाल (मिश्र दुहेरी-कांस्य)

टेबल टेनिस आणि पॅरा टेबल टेनिस

अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला (मिश्र दुहेरी -सुवर्ण), अचंता शरथ कमल, साथियान ज्ञानसेकरन, हरमीत देसाई, सनील शेट्टी (पुरुष संघ-गोल्ड), भावना पटेल (महिला एकेरी वर्ग 3-5-गोल्ड), अचंता शरथ कमल (पुरुष संघ) एकेरी-सुवर्ण), अचंता शरथ कमल आणि साथियान ज्ञानसेकरन (पुरुष दुहेरी-रौप्य), साथियान ज्ञानसेकरन (पुरुष एकेरी-कांस्य), सोनल पटेल (महिला एकेरी वर्ग 3-5-कांस्य)

भारोत्तोलन

सायकोम मीराबाई चानू (महिला 49 किलो-सुवर्ण), जेरेमी लालरिनुंगा (पुरुषांचे 67 किलो-सुवर्ण), अचिंता शेउली (पुरुषांचे 73 किलो-सुवर्ण), संकेत सरगर (पुरुषांचे 55 किलो-रौप्य), बिंद्याराणी देवी (महिलांचे 55 किलोग्राम-सुवर्ण) 96 किलो-रौप्य), गुरुराजा पुजारी (पुरुषांचे 61 किलो-कांस्य), हरजिंदर कौर (महिला 71 किलो-कांस्य), लवप्रीत सिंग (पुरुषांचे 109 किलो-कांस्य), गुरदीप सिंग (पुरुषांचे 109+ किलो-कांस्य)

कुस्ती

बजरंग पुनिया (पुरुषांचे 65 किलो-सुवर्ण), साक्षी मलिक (महिलांचे 62 किलो-गोल्ड), दीपक पुनिया (पुरुषांचे 86 किलो-सुवर्ण), रवी कुमार दहिया (पुरुषांचे 57 किलो-सुवर्ण), विनेश फोगट (महिलांचे 53 किलो-गोल्ड), विनेश फोगट (महिलांचे 53 किलो-गोल्ड) -सुवर्ण), अंशू मलिक (महिलांचे 57 किलो-सिल्व्हर), दिव्या काकरन (महिलांचे 68 किलो-कांस्य), मोहित ग्रेवाल (पुरुषांचे 125 किलो-कांस्य), पूजा गेहलोत (महिलांचे 50 किलो-कांस्य), पूजा सिहाग (महिलांचे 50 किलो-कांस्य), दीपिका सिहाग (महिलांचे 68 किलो-कांस्य) नेहरा (पुरुषांचे ९७ किलो-कांस्य)

Leave A Reply

Your email address will not be published.