चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार जाहीर

तर ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराची घोषणा

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला २ कांस्यपदकं जिंकून देणाऱ्या मनू भाकरला खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. यासह बुद्धिळपटू डी गुकेशचाही मोठा सन्मान केला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्या येत होत्या की, भारताला दुहेरी पदक जिंकून देणाऱ्या मनू भाकरला या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं नाही. मात्र आता या सर्व अफवांना पूर्णविराम देत, मनू भाकरला क्रीडा विश्वातील सर्वात मोठा पुरस्कार मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मनू भाकर, डी गुकेशसह आणखी ४ खेळाडूंची खेलरच्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

https://x.com/ANI/status/1874743593048654149

मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत घवघवीत यश मिळवलं होतं. तिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात आणि २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली होती. यासह ऑलिम्पिक स्पर्धेत २ पदकं जिंकणारी ती पहिलीच महिला भारतीय खेळाडू ठरली होती.

भारताचा युवा बुद्धिबळपटू डी गुकेशनेही कोट्यावधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली होती. त्याने १२ डिसेंबर २०२४ रोजी बुद्धिबळपटू क्रीडा प्रकारात वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला होता. त्याने या स्पर्धेतील फायनलमध्ये चीनच्या डिंग लिरेनेचा पराभव केला होता. यासह वयाच्या १८ व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन बनला होता.

वयाच्या १८ व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन होणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला होता. यापूर्वी कुठल्याही भारतीय बुद्धिबळपटूने इतक्या कमी वयात वर्ल्ड चॅम्पियनशिपचा खिताब पटकावला नव्हता. यासह ३२ खेळाडूंना अर्जून पुरस्कार मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्यात भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा अॅथलिट प्रवीण कुमारचा देखील समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.