‘खेळ पैठणीचा’ अन् हळदी-कुंकू सोहळा उत्साहात

नांद्रा येथे लाडक्या बहिणींवर बक्षिसांची लयलूट

0

 

लासगाव ता. पाचोरा

मकर संक्रांतीचे औचित्य साधून येथे अस्मिता फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘हळदी-कुंकू’ आणि ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. महाराष्ट्राचे लाडके भावजी क्रांतीनाना मळगावकर यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने आणि भरघोस बक्षिसांनी महिलांमध्ये उत्साहाचे उधाण आले होते. सामाजिक सलोखा आणि विरंगुळा अस्मिता फाउंडेशनच्या संचालिका डॉ. अस्मिता पाटील यांच्या संकल्पनेतून श्रीराम आश्रमासमोरील पटांगणात हा सोहळा रंगला. कुरंगी-बांबरुड गटातील महिलांना दैनंदिन कामातून विरंगुळा मिळावा आणि सामाजिक सलोखा वाढावा, या उद्देशाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मान्यवरांची उपस्थिती आणि सत्कार

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पाचोरा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुनीता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल सुनीता पाटील व नवनिर्वाचित नगरसेवकांसह सरपंच कल्पना पाटील व मा. सरपंच आशाबाई तावडे, यांच्या सह मान्यवर शिवसेना महिलां आघाडीच्या पदाधिकारी वंदना पाटील ललिता पाटील, नगरसेविका जयश्री पाटील, सामनेरच्या अलका बोरसे, अर्चना पाटील, संगीता पाटील, अनिता पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी यावेळी तळ्यात मळ्यात, फुगे फोडणे, व्यासपीठा समोरील महिला भगिनींच्या गर्दी मधून वस्तू आणणे, लहान बाळ आजींना आणणे, फुगे फोडणे, उखाणे घेणे, नृत्य अशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महिला भगिनींनी यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला विजेता महिलां भगिनींसाठी गिफ्ट हॅम्पर व इतर पैठणी साड्यांचे घरगुती वापरातील वस्तू यांचा वर्षाव करण्यात आला.

कार्यक्रमाला निवेदक होम मिनिस्टर प्रेम लाडके भाऊजी क्रांतीनाना मळगावकर यांच्या सह कु. सह्याद्री मळगावकर यांनी आयोजित केलेल्या विविध खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच उपस्थित प्रत्येक महिलेला फाउंडेशनच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमामुळे नांद्रा आणि परिसरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रदीर्घ काळानंतर अशा मोठ्या सोहळ्याचे साक्षीदार होता आल्याची भावना महिलांनी व्यक्त केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी अस्मिता फाउंडेशन यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.