संपादकाला धमकी देणाऱ्या पाणी पुरवठा अभियंत्यावर गुन्हा दाखल करावा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

खामगाव; साप्ताहिक बुलडाणा बातमीपत्राचे संपादक आकाश पाटील यांनी त्यांच्या  साप्ताहिकामध्ये २५ जानेवारी २०२२ रोजी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा पैसा जाणार पाण्यात, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग खामगावचा प्रताप वरिष्ठाकडे तक्रारी, कारवाई मात्र शुन्य, या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती.

त्या बातमीमुळे पाणी पुरवठा विभागातील भ्रष्टाचार जनतेसमोर आला होता व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा भ्रष्टाचार उजेडात येत असल्यामुळे सदरची बातमी प्रकाशित झाल्याने पाणी पुरवठा अभियंता व्ही.एम.चव्हाण याला जिव्हारी लागली.

त्यामुळे त्यांनी चिडून जाऊन १/२/ २०२२ रोजी दुपारी २.४७ मिनीटांच्या दरम्यान पाणी पुरवठा विभागात नेहमीच वावरत असलेल्या जाधव नामक इसमाच्या मोबाईल (९८८१६१९०४१) वरुन बुलडाणा बातमीपत्राचे संपादक आकाश पाटील यांना फोन करुन अश्लिल भाषेत शिवीगाळ केली व जीवाने मारण्याच्या धमक्या देऊन पत्रकारावर दबाव

तंत्राचा वापर केलेला आहे व भविष्यात कोणत्याही प्रकारची बातमी छापु नये असे सांगितले. यामुळे पत्रकारांवर अन्याय होऊन एक प्रकारचे भितीचे वातावरण तयार झाले. या सर्व प्रकरणाची तक्रार २/ २/२०२२ रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे दिली होती.

तरी अद्याप एक महिना उलटुनसुध्दा खामगाव शहर पोलीसांनी धमकी देणान्या संबंधीत पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे खामगाव शहरातील सर्व पत्रकारांनी एकत्र येत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पाणी पुरवठा अभियंता व्ही.एम.चव्हाण यांच्यावर त्वरित पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी. याकरीता निवेदन देण्यात आले.

बुलढाणा बातमीपत्राच्या संपादकाला धमकी देणाऱ्या पाणी पुरवठा अभियंता व्ही.एम.चव्हाणवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तात्काळ कारवाई करावी पत्रकारांचे डीवायएसपी अमोल कोळी यांना आज निवेदन देण्यातआले दरम्यान. पाणी पुरवठा अभियंता विलास चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिले

यावेळी आनंद गायगोळ, कुणाल देशपांडे, आकाश पाटील, शिवाजी भोसले, रुपेश कलंत्री, सुधीर टिकार, अनिल खोडके, गणेश पानझाडे, किरण मोरे, मोनु शर्मा, योगेश हजारे, सुमित पवार, महेश देशमुख, मोहन हिवाळे, सैय्यद अकबर, धनंजय वाजपे यासह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.