bet at home gutschein coupon home depot coupon code 10 good grandmother gifts for christmas prairie lights coupon 2012
Monday, December 5, 2022

खान्देशातील पहिल्या ई- बाईक कंपनीची, सिका ई–मोटर्स इलेक्ट्रिक बाईक लॉन्च…

- Advertisement -

 

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

सध्या घडीला पेट्रोलच्या वाढत्या दाराला ग्राहक अगदी त्रासलेला आहे, त्याच सोबत वाढते प्रदूषण देखील मोठी समस्या म्हणून पुढे येत आहे, अश्यातच सिका ई – मोटर्स इलेक्ट्रिक बाईक बनवणाऱ्या खान्देशातील पहिल्या कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक बाईकचे वैशिष्ट्ये सांगत प्रत्येक शहर, गाव, खेडे यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून खान्देश प्रदूषण मुक्त करण्याचे श्रीराम पाटील यांचे आवाहन सिका ई – मोटर्स प्रा. ली. चे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीराम पाटील यांनी आज दि.12 नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.

काल शुक्रवार, दि. ११-११-२०२२ रोजी जळगाव एमआयडीसी स्थित एका हॉटेल येथे सिका इ मोटर्स च्या स्मॅक या हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर चा भव्य लॉन्चिंग सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील तसेच जिल्ह्यातून अनेक मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलतांना पुढे श्रीराम पाटील यांनी स्मॅक या स्कूटर बद्दल अधिक माहिती दिली. ३३ वर्षापासून ऑटोमोबाईल क्षेत्रात यशस्वीरीत्या सर्व्हिस देऊन उत्कृष्ठ सर्व्हिस देणे हेच कर्तव्य मानून वाटचाल करीत आलो आहोत. त्यासोबतच खानदेशातल्या प्रत्येक शहर, गाव, खेडे यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून स्वतःपासून सुरुवात करून आपला परिसर प्रदूषण मुक्त करण्याचे आवाहन केले. ग्राहक सेवा हीच ईश्वरसेवा है ब्रीदवाक्य घेऊन जास्त ग्राहक न बनवता ग्राहकांसोबत जास्तीत जास्त नाते मजबूत व्हावे यावर आम्ही जास्त भर देतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

स्मैक या स्कूटर बद्दल सांगतांना त्यांनी सांगितले कि, हि स्कूटर आरटीओ पासिंग प्रकारातील असून यात ६० व्होल्ट ची दमदार लिथियम आयन बॅटरी चा समावेश केलेला आहे. या बॅटरीमुळे सदरील स्कूटर प्रति चार्ज १०० किलोमीटर चालेल असा कंपनीचा दावा आहे. या स्कूटर मध्ये डिजिटल डिस्प्ले, रिजनरेटिव्ह कंट्रोलर, टेलिस्कोपिक सस्पेंशन, अँटीयेफ्ट अलार्म सिस्टिम, रिव्हर्स गियर, साईड स्टॅन्ड सेन्सर, ट्युबलेस टायर्स तसेच यूएसबी चार्जर यासारख्या विविध सुविधा उपलब्ध असून, सदर स्कूटर ७ विविध रंगात उपलब्ध आहे.

वाढते प्रदूषण आणि इंधनाची बचत यासाठी इलेक्ट्रिक वाहन किती आवश्यक आहे याची गरज बघता जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी त्याच क्षणी २५ स्कूटर खरेदी करण्याचे आश्वासन देऊन बुकिंग केले. तसेच सर्जना मीडिया चे संचालक रवींद्र लड्ढा यांनी ५ स्कूटरचे व लक्ष्मी केमिकल चे डायरेक्टर सी जे सूर्यवंशी यांनी स्कूटर त्याचक्षणी बुक केली

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या