Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»क्रीडा»‘खान्देश रन २०२५’ साठी जळगाव सज्ज
    क्रीडा

    ‘खान्देश रन २०२५’ साठी जळगाव सज्ज

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 27, 2025No Comments6 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ‘खान्देश रन २०२५’ साठी जळगाव सज्ज

    ३००० धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग; रविवारी पहाटे मॅरेथॉनला सुरुवात

    जळगाव प्रतिनिधि शहरात जळगाव रनर्स ग्रुपतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘खान्देश रन (मॅरेथॉन)’ चे आयोजन करण्यात आले असून ही भव्य धावस्पर्धा रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सागर पार्क मैदान येथे पार पडणार आहे. यंदा या मॅरेथॉनसाठी तब्बल ३००० धावपटूंनी ऑनलाइन नोंदणी केली असून जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रातून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

    समाजामध्ये व्यायाम, आरोग्य आणि फिटनेसविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने जळगाव रनर्स ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. खान्देश रनमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गेल्या पाच वर्षांत अनेक नागरिकांना सकाळी लवकर उठून नियमित व्यायाम करण्याची सवय लागली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक उत्कृष्ट धावपटू घडले असून त्यांनी जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे १५ ते २० धावपटूंनी ‘आयर्नमॅन’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची कामगिरी करत परदेशातही जळगावचे नाव उज्वल केले आहे.

    खान्देश रन २०२५ च्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला एक्सपो खान्देश सेंट्रल मॉल, जळगाव येथे उत्साहात पार पडला. या एक्सपोमध्ये सर्व नोंदणीकृत धावपटूंना स्पर्धेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी धावपटूंना ड्राय-फिट टी-शर्ट, बिब नंबर तसेच गुडी बॅगचे वितरण करण्यात आले. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व धावपटूंनी स्वतः उपस्थित राहून आवश्यक साहित्य स्वीकारले.

    रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ५ वाजता सागर पार्क येथून खान्देश रनला सुरुवात होणार आहे. ही मॅरेथॉन चार गटांमध्ये पार पडणार असून त्यामध्ये २१ किमी हाफ मॅरेथॉन, १० किमी टाइम रन, ५ किमी स्टॅमिना रन आणि ३ किमी फन रन यांचा समावेश आहे.

    सागर पार्क येथून सुरू होणारी ही धावस्पर्धा काव्यरत्नावली चौक, डी-मार्ट, मोहाडी रोड मार्गे लांडोरखोरीपर्यंत जाणार असून तेथून यू-टर्न घेऊन त्याच मार्गाने पुन्हा सागर पार्क येथे येऊन स्पर्धेचा समारोप होणार आहे, अशी माहिती जळगाव रनर्स ग्रुपचे अध्यक्ष किरण बच्छाव यांनी दिली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif