Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगावात 26 फेब्रुवारीपासून रंगणार ‘खान्देश महोत्सव!’
    जळगाव

    जळगावात 26 फेब्रुवारीपासून रंगणार ‘खान्देश महोत्सव!’

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 20, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    स्थानिक महिला बचत गट, उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खान्देश महोत्सव 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव 26 फेब्रुवारी ते 2 मार्च 2026 या कालावधीत सागर पार्क येथे पार पडणार आहे. महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यममातून केले आहे.

    या महोत्सवात खान्देशातील संस्कृती, खाद्यपरंपरा आणि हस्तकलेचे दर्शन घडणार आहे. महोत्सवात एकूण 180 स्टॉल्स असणार असून, त्यामध्ये प्रामुख्याने विविध वस्तूंचा समावेश असेल. बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, होम अप्लायन्सेस, किचन अप्लायन्सेस आणि इलेक्ट्रॉनिक ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, ऑफिस आणि होम डेकोरेटिव्ह वस्तू, खान्देशी पद्धतीचे शाकाहारी आणि मांसाहारी अस्सल खाद्यपदार्थ महोत्सवात आहेत. केवळ खरेदीच नव्हे, तर नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    दि. 28 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध अभिनेता ओम यादव यांच्या उपस्थितीत ‘पैठणी, राणीहार आणि भेटवस्तू’ जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. गायक, समूह नृत्य आणि स्थानिक कलावंतांचे सादरीकरण होईल. लहान मुलांसाठी खास ‘गेम झोन’ आणि जादूगाराचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.दैनंदिन जीवनातील उपयुक्त वस्तू (मिक्सर, टोस्टर) आणि उत्कृष्ट स्टॉल धारकांचा गौरव केला जाणार आहे.

    महापौर दीपमाला काळे यांनी जळगावमधील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या कुटुंबासह या महोत्सवाला भेट द्यावी आणि स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादनांना खरेदीद्वारे पाठबळ द्यावे तसेच या महोत्सवामध्ये प्लॅस्टिकमुक्ती ही थीम घेऊन नागरिकांना कापडी पिशव्या देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती उपमहापौर मनोज चौधरी यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    जिल्ह्यात तापमानाने ओलांडली चाळीशी!

    March 10, 2026

    पोलिस कॉन्स्टेबलने संपविले जीवन!

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.