गाळेधारकांकडून न.प. प्रशासनाचा असाही निषेध !

0

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

स्थानिक एसडीओ कार्यालयासमोरील नेहरू कॉम्पलेक्समधील मुत्रीघराची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे असह्य दुर्गंधी पसरल्याने गाळेधारकांनी मुत्रीघर बंद करून न.प. प्रशासनाचा एकप्रकारे निषेध केला असल्याचे बोलले जात आहे. तर न.प. मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असलेले मनोहरराव अकोटकर हेच प्रशासकपदी विराजमान झाल्याने त्यांच्याकडून नागरिकांनी रास्त अपेक्षा तरी कराव्यात कशा असे उपहासाने बोलले जात आहे.

स्थानिक एसडीओ कार्यालयासमोरील नेहरू न.प. कॉम्प्लेक्समध्ये विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने, विदर्भ कोंकण ग्रामीण बँक, वर्तमानपत्रांचे कार्यालय, भाजपा आमदार यांचे कार्यालय, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यालय तसेच कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील भागात न.प. दवाखाना व लॉयन्स आय हॉॅस्पीटल असल्याने नागरिकांची दिवसभर वर्दळ असते. त्यामुळे मुत्रीघराचा जास्त प्रमाणात उपयोग होणे साहजिक आहे. त्यातच काही मद्यपीसुध्दा रात्रीच्या वेळी मुत्रीघरात मद्यप्राशन करून बाटल्या तेथेच टाकत आहे. मात्र ही घाण नियमितपणे साफ करण्यात येत नाही.

परिणामी मुत्रीघरात साचलेल्या घाणीमुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरल्याने अखेर गाळेधारकांनी मुत्रीघर बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून पर्यायी व्यवस्था म्हणून न.प. दवाखाना परिसरात आपला कार्यभाग उरकत आहेत. तरी न.प. प्रशासनाने गाळेधारकांची समस्येतून मुक्तता करीत नागरिकांची गैरसाय दूर करावी अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.