Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»खडसेंच्या निमंत्रणपत्रिकेने वाढवला राजकीय ‌‘सस्पेन्स‌’!
    राजकारण

    खडसेंच्या निमंत्रणपत्रिकेने वाढवला राजकीय ‌‘सस्पेन्स‌’!

    फडणवीस-पवार एकाच मंचावर : महायुतीच्या दिग्गजांची उपस्थिती
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 20, 2026No Comments888 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळा राजकीय वर्तुळात चर्चेचे केंद्र बनले आहे. दि. 30 ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे होणाऱ्या या सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेनेच राजकीय चर्चांना नवे वळण दिले आहे.

    श्री. खडसे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमंत्रणपत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध पक्षांतील मंत्री, माजी मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख नेत्यांची छायाचित्रेही पत्रिकेत झळकत आहेत. त्यामुळे खडसेंच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकाच व्यासपीठावर येणार का? हा प्रश्न आता राजकीय चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे.

     श्री. खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा विचार करता विविध पक्षांतील नेत्यांशी त्यांचे राजकीय आणि वैयक्तिक संबंध राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोन्ही दिग्गजांची नावे ठळकपणे दिसत असल्याने या कार्यक्रमाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. एकेकाळी भाजपमध्ये राज्यातील आक्रमक आणि प्रभावी नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या खडसेंनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाच्या चर्चांना वेळोवेळी उधाण येत राहिले. आता अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेत भाजपचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती नमूद झाल्याने खडसे पुन्हा कमळाकडे? या चर्चेला पुन्हा हवा मिळाली आहे.

    खडसेंचा अमृत महोत्सव हा त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीचा गौरव करणारा सोहळा असला, तरी निमंत्रणपत्रिकेने त्याला राजकीय रंग चढवला आहे. महायुतीतील प्रमुख नेत्यांसोबत विरोधी पक्षातील नेतेही या सोहळ्यात दिसणार असल्याने कोथळी येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठींचे अनोखे दृश्य पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रश्न केवळ खडसेंचा अमृत महोत्सव किती भव्य होणार? एवढाच राहिलेला नाही. त्यापेक्षा मोठा प्रश्न आहे या मंचावरून महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणता नवा संदेश मिळणार? खडसेंचा भाजप प्रवेश होणार की नाही, फडणवीस प्रत्यक्ष उपस्थित राहणार की नाही, पवार-फडणवीस एकाच मंचावर येणार का आणि या भेटीगाठींमधून कोणते राजकीय संकेत मिळणार, याची उत्तरे दि. 30 ऑगस्टच्या सोहळ्याकडे लागलेल्या महाराष्ट्राच्या राजकीय नजरा ठरवणार आहेत.

    फडणवीस, पवारही येणार?

    खडसे आणि फडणवीस यांच्यातील राजकीय संबंध महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. भाजपमधील दीर्घ राजकीय प्रवास, त्यानंतर झालेले मतभेद, पक्षबदल आणि त्यानंतरचे राजकीय समीकरण यामुळे या दोन्ही नेत्यांची एका मंचावरील संभाव्य भेट उत्सुकता वाढवणारी ठरणार आहे. दुसरीकडे, शरद पवार यांची उपस्थितीही या कार्यक्रमाला वेगळे राजकीय परिमाण देणारी ठरू शकते. त्यामुळे एका बाजूला फडणवीस, दुसऱ्या बाजूला पवार आणि मध्यभागी खडसे, असे चित्र प्रत्यक्षात उभे राहिले तर त्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    राजकीय ‌‘कमबॅक‌’चा ट्रेलर?

    खडसेंच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांमध्येही उत्सुकता आहे. विशेषतः खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार का? हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र केवळ निमंत्रणपत्रिकेतील नेत्यांची नावे किंवा छायाचित्रे पाहून खडसेंच्या राजकीय भूमिकेबाबत निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी कोणते नेते हजेरी लावतात, कोणते नेते अनुपस्थित राहतात, कोणते नेते काय बोलतात आणि खडसे स्वतः कोणता राजकीय संदेश देतात, यावरच या सोहळ्याचे खरे राजकीय महत्त्व स्पष्ट होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif