शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट तिला भोवण्याची शक्यता आहे. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

केतकी विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात केतकीने आक्षेपाहार्य पोस्ट केली. त्यानंतर तिच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच केतकीविरोधात पुणे सायबर विभागाकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.