केळी पिक विमा धारक 11360 शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा : खा. उन्मेश पाटील

0

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत केळी पिकाचा अंबिया बहार सन 2022 मध्ये जिल्ह्यातील 77832 शेतकऱ्यांनी 81465.11 हेक्टर क्षेत्रावर केळी पिकाचा विमा काढला होता.

याबाबत पिक विमा कंपनीने वेळेवर पिक पडताळणी न केल्याने केळी पिकाच्या लागवड क्षेत्राबाबत मोठी समस्या उद्भवली होती. याकरिता विमा कंपनीने MRSAC कडून सॅटॅलाईट इमेज प्राप्त करून केळी पिक लागवड केलेले क्षेत्र निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने प्राप्त अहवालानुसार जळगाव जिल्ह्यातील 53951 शेतकऱ्यांनी 56912.12 हेक्टर क्षेत्रावर लागवड केलेल्या केळी पिकास 378 कोटी 30 लाखाची नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले होते. या अहवाला मध्ये एकूण 11360 शेतकऱ्यांनी केळी लागवड केलेले क्षेत्र कमी असून शेतकऱ्यांनी जास्त क्षेत्रावर पिक विमा काढल्याचे निष्कर्ष काढण्यात आला होता. या सर्व 11360 शेतकऱ्यांचा विमा हप्ता (शेतकऱ्यांनी भरलेला) तो शासनास जमा करण्याबाबत विमा कंपनी प्रयत्न करत असताना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी राज्याचे कृषि सचिव यांची भेट घेऊन सरसकट शेतकऱ्यांचे विमा हप्ता शासनास न जमा करण्याची मागणी लावून धरली व याकरिता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून माहिती सादर केली. त्यांनी सादर केलेल्या माहितीनुसार राज्याचे कृषि सचिव यांनी शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्ता सरसकट शासनास जमा करु नये तसेच शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष लागवड केलेल्या केळीचे क्षेत्र ग्राह्य धरून त्या क्षेत्राच्या अनुषंगाने मंजुर नुकसान भरपाई देण्याचे लेखी आदेश विमा कंपनीस दिले आहे. यामुळे 11360 शेतकऱ्यांना केळी पिक विमा नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग या माध्यमातून मोकळा झाला आहे. तसेच पिक पडताळणी प्रलंबित असलेल्या 1902 शेतकरी पैकी 1883 शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना मान्यता मिळाली असून या शेतकऱ्यांची देखील नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण…

जळगाव जिल्ह्यातील 11360 केळी पिक विमा धारक शेतकऱ्यांची विमा नुकसान भरपाई मिळण्याच्या अशा मावळल्या होत्या. या बाबत विमा कंपनीने नुकसान भरपाई बाबतचा निर्णय प्रलंबित ठेवला असल्याने खासदार उन्मेश दादा पाटील यांनी अभ्यासपूर्ण माहिती सादर करून शेतकऱ्यांनी भरलेला पिक विमा हप्ता शासनास जमा करु नये व लागवड केलेले क्षेत्र अंतिम ग्राह्य धरून पिक विमा नुकसान भरपाई अदा करण्याची मागणी करून त्यास मंजूरी मिळवून घेतल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असून प्रलंबित पिक विमा मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

पात्र 53951 शेतकऱ्यापैकी 42243 शेतकऱ्यांची नुकसान भरपाई विमा कंपनीने अदा केली होती. त्या नुसार खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दोन दिवसापूर्वी विमा कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात जाऊन जा विचारून तात्काळ दोन दिवसात नुकसान भरपाई देण्याची मुदत दिली होती. त्या अनुषगाने प्रलंबित 11800 शेतकऱ्यांची विमा नुकसान भरपाई देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.