केसीईचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये 24 व्या आयटी फेस्टाचा समारोप

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

गेले दोन दिवस चाललेल्या 24 व्या आय टी फेस्टाचा समारोप झाला. संपूर्ण महाराष्ट्रातुन 250 विद्यार्थ्यांचा प्रतिसाद या आय टी फेस्टाला मिळाला.
व्यासपिठावर आय एम आर च्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे, डिन डॉ तनुजा फेगडे, प्रमुख पाहुणे डॉ अजय पाटील फेस्टाचा समन्वयक भावना जावळे आणि अंकिता तिवारी उपस्थित होत्या. फातिमा चुनावाला यांनी प्रस्तावना केली. याप्रसंगी विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना डॉ अजय पाटिल म्हणाले, “तुम्ही स्वतःच स्वतःचे जज्ज व्हायला हवे. यापुढे तुमच्या इनोव्हेटिव्ह आणि न्यु आयडिया महत्त्वाच्या ठरणार आहेत. तुमची डिग्री कोणती आहे यापेक्षा तुम्ही कीती अपडेट आहात हे जास्ती महत्त्वाचे ठरणार आहे.”

त्यानंतर परीक्षकांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. सिनीअर क्यू.ए. इंजिनीअर, मीडियाओशन कंपनी नेहा केंकरे म्हणाल्यात ,” 100 % एफर्ट हवेच पण त्याबरोबरीने तुमचे स्कील कोआँर्पेट मध्ये अतिशय महत्वाचे ठरतात. आय टि ईंडस्टी ला नेमके काय हवे याचा नीट अभ्यास करा. तुमची डिग्री आणि मार्क जितके महत्वाचे नाही त्यापेक्षा तुम्हाला तुमच्या विषयातले काय येते, त्याचे ईंप्लिमेंटेशन तुम्ही कसे करतात त्यात किती इनोव्हेशन आणि न्यु आयडिया आहेत हे महत्वाचे ठरते.” त्यानंतर आय एम आर च्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाल्यात,” इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही महाराष्ट्रातुन सहभाग नोंदविला, तुमचे स्कील इथे पणाला लावले, तेच तुम्हाला कार्पोरेट मध्ये कामाला येणार आहे. तुम्ही बौध्दिक इन्व्हेस्ट्मेंट महत्वाची आहे. त्याकडे नीट लक्ष द्या. त्यांनी विद्यार्थ्यांना सुहास गोपीनाथचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना ईनोव्हेटिव्ह स्कील कसे सिद्ध केले. अश्या इंन्पायरींग स्टोरी शोधा. तुमची बुध्दी तुमचा मोठा रिसोर्स आहे त्याचा उपयोग करा. ”

आयटी फेस्टा 2023 चे यंदाचे सलग चोविसावे वर्ष असून, या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ‘सॉफ्टवेअर एक्झिबीशन, बेब डेव्हलपमेंट,आणि आयटी क्विझ अशा तीन कॉम्पीटीशन घेण्यात आल्या.
दुसऱ्या दिवशी, टेक्झीऑन २०२३ चे आयोजन करून या टेक्निकल इव्हेंट चा समारोप करण्यात आला. यात सी. / सी. प्लस प्लस प्रोग्रामिंग काँटेस्ट, पोस्टर प्रेझेंटेशन आणि गेमिंग या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सी./ सी. प्लस प्लस प्लस प्रोग्रामिंग
स्पर्धेच्या परिक्षक म्हणून डॉ. मोनाली खाचणे यांनी काम पाहिले. एकूण ४० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत त्यांचा सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रा. उदय चतुर , प्रा. शमायला शेख यांनी परिश्रम घेतले.

पोस्टर प्रेझेंटेशन साठी प्रा. प्रियांका बऱ्हाटे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ह्या स्पर्धेत २५ टिमने सहभाग नोंदवला . प्रा. श्वेता फेगडे, प्रा. गीता सूर्यवंशी यांनी या स्पर्धेच्या नियोजनासाठी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

गेमिंग साठी २२ टीम्स नी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे नियोजन एम. सी. ए. च्या विद्यार्थ्याना प्रा. एस. एन. खान आणि प्रा. तेजस सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सॉफ्टवेअर एक्झीविशन स्पर्धेसाठी आय. एम. आर. च्या इंन्होवेशन काऊन्सिल च्या प्रमुख डॉ वर्षा पाठक यांनी परिश्रम घेतले. तसेच आयटी क्विज़ साठी प्रा. दिपाली किरंगें, प्रा. श्वेता रमाणी यांनी काम पाहिले संस्थेच्या अकॅडमीक डीन तसेच एचओडी डॉ. तनुजा फेगडे यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यानंतर झालेल्या बक्षिस समारंभात खालील बक्षिसे जाहीर झालीत
साॅफ्टवेअर डेव्हलपमेंट स्पर्धा – सर्वप्रथम ठरलेत कुणाल पाटील आणि टिम
व्दितीय आकांक्षा पाटील आणि टिम
वेब डेव्हलपमेंट स्पर्धा
सर्वप्रथम यशोदिप पाटिल आणि टिम
व्दितीय गायत्री पाटिल आणि टिम
आय टि क्विज
प्रथम गौरव वाणी,
द्वितीय पुष्कर सरोदे आणि यश चौधरी
तृतीय योगीनी ईंगळे आणि आयुष वाणी
पोस्टर स्पर्धा
सर्वप्रथम वैष्णवी देशमुख आणि मोनिका अडकीणे ,
कुंतल पाटील व्दितीय
सी सी ++प्रोग्रामिंग स्पर्धा
सर्वप्रथम मयुर बोंद्रे
व्दितीय रोहित रामटेके
गेमींग स्पर्धा
सर्वप्रथम तुषार वालेचा
व्दितीय निशांत पटकरी आणि प्रशांत पवार
त्यानंतर आभार प्रदर्शन अकिंता तिवारीने केले.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.