Tuesday, May 24, 2022

कबचौ उमविचे प्रभारी कुलसचिव डॉ. शिंदेंचा राजीनामा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध महत्वाच्या पदांचा प्रभार मिळालेले मान्यवर हे एकामागून एक आपापल्या पदांचा राजीनामा देत आहेत. यात आता विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. आर. एल. शिंदे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा कुलगुरुंकडे दिला आहे.

विद्यापीठात राजीनामा सत्र सुरूच आहे. याआधी प्रा. भादलीकर यांच्यानंतर प्रा. ए. बी. चौधरी यांच्याकडे कुलसचिवपद देण्यात आले. मात्र, काही दिवसातच त्यांनीही राजीनामा दिला. यानंतर पुन्हा डॉ. भादलीकर यांना पदभार देण्यात आला पण पुन्हा कर्मचार्‍यांनी विरोध केल्याने त्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता.

दरम्यान स्टॅटीस्टीक्स ऍक्चुरिअल सायन्स विभागाचे प्रा. डॉ. आर. एल. शिंदे यांच्याकडे पदभार देण्यात आला. मात्र त्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या