बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत कवाडे गट !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई – राज्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाने प्रकाश आंबेडकर यांच्याशी युतीची चर्चा केल्यानंतर राज्यातील शिंदे गट (shinde gat) आता प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स रिपब्लिकन पार्टीची (peopals ripublican parti) युती केल्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स रिपब्लिकन पार्टीची युती झाली आहे. तसंच पत्रकच जोगेंद्र कवाडे यांनी काढलं आहे. दरम्यान, पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर कवाडे यांनी स्तुतीसुमनं उधळली. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी एक पत्रक काढलं आहे. त्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आमची युती होत आहे. याची अधिकृत घोषणा पत्रकार परिषद घेत कवाडे यांनी केली.

आम्ही लोकांना न्याच देण्याची भूमिका घेतली. आमचा संघर्ष साधासुधा नव्हता. चळवळीत आक्रमकपणे न्याय मिळवून दिला. दोन्ही पक्ष संघर्षातून पुढे आले आहेत. कवाडेंसोबत आधीपासूनच जिव्हळ्यांचे संबध आहेत.
लाठ्या काठ्या खाऊन इथपर्यंत पोहचलो आहे. लोकांना न्याय देणारे दोन्ही पक्ष एकत्र आले. कवाडे यांचे आंदोलन देशव्यापी होतं. आमची बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका असं मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलं. ठाकरेंना आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही. सर्व सामान्यात मिसळणारा मुख्यमंत्री राज्याला लाभला. धाडसी मुख्यमंत्री महाराष्ट्रला लाभला. महाराष्ट्रला नवीन दिशा देण्यात काम करु. बऱ्याच दिवसांपासून युतीची चर्चा सुरु होती. शिंदे गटासोबत युती करण्याचं पक्षात मत होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.