Thursday, September 29, 2022

कावड यात्रेदरम्यान डिजेवर नाचताना वीजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू…(व्हिडीओ)

- Advertisement -

 

- Advertisement -

इंदूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

- Advertisement -

- Advertisement -

कावड यात्रेदरम्यान डिजेच्या तालावर नाचताना वीजेचा शॉक (Electric Shock) लागून एका यात्रेकरुचा मृत्यू (Death) तर तीन (Three) जण जखमी (Injured) झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी (Monday) दुपारी इंदूर (Indore) जिल्ह्यातील महू येथे घडली आहे.

यात्रेकरू डीजे लावलेल्या वाहनावर चढून नाचत होते. त्यादरम्यान हाताला 11 हजार किलोवॅटच्या विजेच्या तारेने स्पर्श केल्याने वाहनात करंट पसरला. वीजेचा झटका लागल्याने काही तरुण वाहनाच्या छतावर पडले. सिमरोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. रौनक असे मयत तरुणाचे नाव आहे. तर शिव, लोकेश आणि अतुल अशी जखमी तरुणांची नावे आहेत. शिवला उपचारासाठी एमवाय रुग्णालयात तर लोकेश आणि अतुलला महू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी डीजे (DJ) चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे इंदूर ग्रामीणचे एसपी (SP) भगवत सिंह विर्दे यांनी सांगितले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या