Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»कतरिना-विकीचे बेबी बंपसोबत ब्लॅक अँड व्हाईट फोटो
    मनोरंजन

    कतरिना-विकीचे बेबी बंपसोबत ब्लॅक अँड व्हाईट फोटो

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 23, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी ‘गुड न्यूज’ शेअर केली आहे. त्यांच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. बेबी बंपसोबत ब्लॅक अँड व्हाईट फोटो टाकत कतरिनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही बातमी शेअर केली आहे. अवघ्या काही मिनिटांपूर्वी शेअर केलेल्या गुड न्यूजवर काही क्षणांतच लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

    गेल्या अनेक महिन्यांपासून कतरिनाच्या प्रेग्नन्सीबद्दल विविध चर्चा सुरू होत्या. मात्र त्यावर कतरिना किंवा विकी कोणीच प्रतिक्रिया दिली नव्हती. काही महिन्यांपूर्वी त्या दोघांचा एअरपोर्टवरील फोटो प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये व्हाईट लूज ड्रेसमध्ये कतरिना दिसल्यावर प्रेग्नन्सीच्या चर्चांनी जोर धरला. तर गेल्या आठवड्यात आर्यन खानच्या चित्रपटाच्या रिलीजसाठीही विकी कौशल एकटाच आला होता, तेव्हाही कतरिना सोबत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

    तर गेल्या आठवड्यातच कतरिनाचा एक फोटो बराच व्हायरल झाला होता. ज्यामध्ये कतरिना प्रेग्नंट असल्याचं दिसत होतं. एका लालसर रंगाच्या गाऊनमध्ये, बेबी बंपसह सुंदर दिसणाऱ्या कतरिनाचा एक धूसऱ फोटो समोर आला होता. एका रेडिट यूजरने तो फोटो शेअर केला होता. मात्र त्यावर कोणतीच अधिकृत कमेंट न आल्याने सर्वांना या अफवा वाटल्या होत्या. पण चाहत्यांना मात्र गुड न्यूजची प्रतीक्षा होतीच.

    इतके महिने याविषयी मौन राखणाऱ्या विकी-कतरिनाने अखेर आज सर्वांसोबत ही गोड बातमी शेअर केलीच. त्यांनी, सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर एक सुंदर, ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत सर्वांना आयुष्यात येणाऱ्या गोड पाहुण्याबद्दल सांगितलं. यामध्ये एक फोटो प्रिंट असलेली फ्रेम असून त्यात गरोदर कतरिना आणि विकी कौशल बेबी बंपकडे प्रेमाने पहात असल्याचं दिसतंय.

    या फोटोवर चाहते, तसेच विकी-कतरिनाचे मित्र-मैत्रिणी, वेल-विशर्स सर्वांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे, तसेच दोघांनाही या नव्या प्रवासासाठी भरभरून शुभेच्छाही दिल्या आहेत. आता विकी-कतरिनाचं बाळ या जगात कधी येतं, त्यांना मुलगा होतो का मुलगी याची चाहत्यांना आणि सर्वांनाच उत्सुकता आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif