कठोपनिषद : भाग ४
यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिन:।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ॥८-२३॥
कोणत्या काली, देह टाकिला असता योगी पुन्हा जन्मास येत नाहीत, आणि कोणत्या काली देहत्याग केला असता ते पुन्हा जन्माला येतात, तो काळ मी तुला सांगतो। अग्निर्ज्योतिरह: शुक्ल: आण्मासा उत्तरायणम्॥ तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रम्ह ब्रम्हविदो जना:॥८-२४॥ अग्नि, ज्योति म्हणजे ज्वाला, दिवस, शुक्लपक्ष, उत्तरायणाचे ६ महिने, अशा काळी मृत्यु पावलेले ब्रम्हवेत्ते ब्रम्हपदाला जातात। धूमो रात्रिस्तथा कृष्ण: षण्मासा दक्षिणायनम्। तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते॥८-२५॥ धूर, रात्र, तसेच कृष्णपक्ष, दक्षिणायनाचे ६ महिने, अशा काळी मरण पावलेले योगी चंद्रलोकात जाऊन परत मृत्युलोकात जन्माला येतात।
शुक्लकृष्ण गती ह्येते जगत: शाश्वते मते।
एकया यात्यनावृत्तिमन्ययाऽऽवर्तते पुन:॥८-२६॥
हे शुक्ल व कृष्ण म्हणजे प्रकाशमय व अंधकारमय असे प्राणिमात्रांचे परलोकचे दोन मार्ग कायमचे मानले गेले आहेत। यातील एका मार्गाने मनुष्यप्राणी पुनर्जन्मरहित स्थितीला जातो व दुसर्या मार्गाने गेलेला पुन्हा जन्ममरणाच्या भोवर्यात सापडतो॥ नैते सृती पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन। तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन॥८-२७॥ या २ मार्गांना तत्वत: जाणणारा योगी मोह पावत नाही। म्हणून, हे अर्जुना, तू सदा सर्वदा योगयुक्त हो।
वेदेषु यज्ञेषु तप:सु चैव
दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टं।
अत्येति तसर्वमिदं विदित्वा
योगी परं स्थानमुपैति चाद्यम्॥८-२८॥
(कर्म) योगी हे सर्व ज्ञान-विज्ञान प्राप्त झाल्यामुळे वेदात, यज्ञात, तपश्चर्येत व दानात जे पुण्यरुप फळ सांगीतले आहे, त्या सर्वांच्या पलिकडे जातो आणि श्रेष्ठ अशा परमपदाला जाऊन पोहोचतो॥
योगी चा मृत्यु- ऊत्तरायण (गीता) भगवद्गीतेत जे सांगीतले आहे, की, योगी आपला देह काही विशेष कालात (ऊत्तरायण) सोडतो, ही गोष्ट केवळ कर्मयोगी साठीच आहे। कर्मयोगी देश, काल, समय, व नियमानुसार आपले सर्व व्यवहार करतो। [देह] सोडण्यासाठीही त्याला उपयुक्त समयच लागतो। त्या काळी त्याला हवे तेव्हा शरीर सोडण्याचे सामर्थ्य येते। पण ही गोष्ट ध्यान-योगी ला लागू नाही। किंवा अष्टांगयोगी साठी नाही; ना प्रेमयोगी साठी, ना ज्ञानयोगीसाठी ही।
योगीचे मरण तेव्हाच होते जेव्हा तो सहस्रारात स्थिर होतो, त्यानंतर मरणासाठी राहातेच काय? जेव्हा जीवदशेचा नाश होतो, तेव्हा सहस्रारात शिवाच्या बरोबर मीलन होऊन योगी एक होऊन जातो। ज्ञानीही ज्या काळी सत्य आत्मतत्वाला प्रत्यक्ष आत्मसात करतो तेव्हा तो अजर, अमर होतो। मुवा. [मुक्तानंद वागीश्वरी]
मुनिभि: पन्नगैर्वापि सुरैर्वा शापितो यदि।
कालमृत्युभयाद् वापि गुरु रक्षति पार्वती॥
॥ गुरुगीता॥१०५॥
ध्यान मे मृत्यु-(आश्रम-पत्रिका-एप्रिल-१९८४, पेज-१६)-स्वामी मुक्तानंद।– ध्यान मे एक बार अपनी मृत्यु का प्रकट ज्ञान होता है। ध्यान में मृत्यु का यह अनुभव जीवन से भी बढकर महत्व का है। भाग्यवान ही इस मृत्यु को प्राप्त करता है। यह अनुभव पाने तक ही उसे मृत्यु का भय रहता है, आगे वह निर्भय हो जाता है। तुकाराम महाराज कहते है, ’आपुले मरण पाहिले म्या डोळा-‘ मैने अपनी मृत्यु अपने आंखोंसे देखी। मैं मृत्यु का साक्षात्कार ईश्वर देखने से बढकर मानता हूं। यह मृत्यु जरुर देखनी चाहिए। मनुष्य के लिये जीवन मे जितने प्रकार की भयानक अवस्थाएं होती है, संघर्ष की, उन सबमे सबसे भयानक मृत्यु-भय है। यह उन्नति के लिये बडा विघ्न है-कही भी यह भय पीछा करता है।
समाप्त

रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२

