Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!
    • पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
    • पाकिस्तानी सैन्याकडून थेट लोकांच्या घरात घुसून गोळीबार
    • लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!
    • ओबीसी क्रिमिलियरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
    • वरणगावचे नगराध्यक्ष काळे यांचा सायकलने अभिनव प्रवास!
    • पाच हजारांची तुटपुंजी रक्कम ७३ लाख शेतकऱ्यांना वाटप!
    • जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अध्यात्म»मृत्युनंतर आत्म्याचे काय होते?
    अध्यात्म

    मृत्युनंतर आत्म्याचे काय होते?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 10, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    भाग १

    कठोपनिषद। हा विषय जीवात्म्या संदर्भात आहे। परमात्म्या संदर्भात नाही। कारण देहधारी जीवात्मा मृत्युनंतर जन्ममृत्यु च्या चक्रात फिरतो। परमात्मा नाही। परमात्मा जन्ममृत्यु च्या पलिकडे आहे। मृत्युनंतर जीवात्म्याचे काय होते हा रहस्यमय विषय यमराज नचिकेताला सांगतात,

    हन्त त इदं प्रवक्ष्यामि गुह्यं ब्रह्म सनातनम् ।

    यथा च मरणं प्राप्य आत्मा भवति गौतम ॥ ६ ॥

    ॥कठोपनिषद-२-५-६॥

    हे गौतमकुलोत्पन्ना, आतां मी तुला गुह्य व सनातन असें ब्रह्म सांगतो; आणि देहाला मरण प्राप्त झालें असतां आत्म्याचे काय होतें हें सांगतो. यमराज या मंत्रात २ विषय नचिकेताला सांगतात, १-सनातन ब्रम्ह म्हणजे परमात्मा याचे स्वरुप व २ रा विषय देहधारी जीवात्म्याला मृत्युनंतर कोणती गती प्राप्त होते? या २ विषयांबद्दल चे ज्ञान या मंत्रात सांगितले आहे। ब्रम्ह म्हणजेच परमात्मा  [परम म्हणजे श्रेष्ठ आत्मा म्हणजेच ब्रम्ह] व देहातील आत्मा म्हणजे सुखदु:खे भोगणारा जीवात्मा या दोन्ही आत्म्यांचे ज्ञान कठोपनिषदात आहे.

    योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः ।

    स्थाणुमन्येऽनुसंयन्ति यथाकर्म यथाश्रुतम् ॥

    ॥कठोपनिषद-२-५-७ ॥

    (आत्मज्ञान न झालेले) कोणी मनुष्य पुन्हा शरीर धारण करण्यासाठी जननेंद्रियामध्यें प्रवेश करतात. दुसरे कोणी अत्यंत अधम मनुष्य वृक्षादि स्थावरभाव पावतात. सारांश, जसे कर्म केलें असेल आणि असें ज्ञान मिळविले असेल त्या मानानें सर्वांना अवस्था प्राप्त होते.

    बाबा मुक्तानंद सांगतात, जीवात्म्याला ४ शरीरे असतात, १-स्थूल देह, २-सूक्ष्म किंवा लिंग देह, ३-कारण देह, व ४-महाकारण देह। मृत्युनंतर दहन संस्कार केल्यावर फक्त स्थूल देह जाळला जातो। इतर ३ देह जन्मोजन्मी जीवात्म्याच्या सोबतच असतात। जेव्हा अध्यात्मिक साधना पूर्ण होऊन जीवाला आत्मसाक्षात्कार होतो, जीव ब्रम्ह होतो तेव्हाच इतर सर्व देह नष्ट होतात। ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या एका अभंगात जीवात्म्याच्या ४ देहांचे खूप सुंदर वर्णन केले आहे..

    आकाशाचा शेंडा कमळ निराळे।

    त्यासी चार दळे शोभताती॥१॥

    औट हात एक अंगुष्ठ दुसरे।

    पर्वार्ध मसुरे प्रमाण हे॥२॥

    रक्त श्वेत श्याम नीलवर्ण आहे।

    पीत केशर माजी तेथे ॥३॥

    तयाचा मकरंद स्वरूप ते शुध्द

    ब्रह्मादिका बोध हाचि झाला॥४॥

    ज्ञानदेव म्हणे निवृत्ती प्रसादे।

    निजरूप गोविंदे जनी पाहता॥५॥

    तुकाराम महाराजांचा याविषयी प्रसिध्द अभंग आहे

    अणुरेणिया थोकडा।

    तुका आकाशाएवढा॥१॥

    गिळुनि सांडिले कलेवर।

    भवभ्रमाचा आकार॥२॥

    सांडिली त्रिपुटी।

    दीप उजळला घटी॥३॥

    तुका म्हणे आता।

    उरलो उपकारापुरता॥४॥ [३३४०]

    मी भ्रमजन्य देहादि-प्रपंच-आकार नाहीसा केला। ज्ञेय-ज्ञाता-ज्ञान इत्यादि त्रिपुटीचा निरास करुन आत्मस्वरुपबोध्दरुपी दीप देहाच्या ठिकाणी प्रकाशित केला।

    आकाशाचा शेंडा-नखशिखान्त शरीर। (१) दल-स्थूल शरीर, रंग लाल। जागृती अवस्था, औट हात-साडे तीन फूट आकार। (२)-सूक्ष्म शरीर-निद्रा घेतो ते, रंग-सफेद, अंगुष्ठप्रमाण, स्वप्नावस्था।  (३)-कारण शरीर-पर्वार्ध-अनामिका अग्रभाग एवढे, रंग-काळा, सुषुप्ती अवस्था। (४)-महाकारण देह, तिळाएवढा, मसूरदल प्रमाण, रंग-नीळा, तुर्यावस्था।

    रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न।

    चिन्मय अंजन सुदले डोळा॥१॥

    तेणे अंजन गुणे दिव्य दृष्टी आली।

    कल्पना निमाली द्वैताद्वैत॥२॥

    देश काल वस्तु भेद मावळला।

    आत्मा निर्वाळला विश्वाकार॥३॥

    न झाला प्रपंच आहे परब्रम्ह।

    अहं सोऽहं ब्रम्ह आकळले॥४॥

    तत्वमसि विद्या ब्रम्हानंद सांग।

    तेचि झाला अंगे तुका आता॥५॥–॥

    रक्त श्वेत नील का नही ज्ञान।

    तहां मूर्ख पंडीत एक समान॥पक-२२७॥

    हाच विषय भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत अर्जुनाला सांगतात,

    श्लोक क्रं-७-ममैवांशो जीवलोके जीवभूत: सनातन:।

    मन:षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति॥७॥

    क्रमशः

    डॉ. गोरखनाथ सुकदेव देवरे
    रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
    नांदगाव, जि. नाशिक
    मो. ९८२२४२८५७२

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वास्तु सुगंधालयाचे दिमाखदार उद्घाटन

    October 23, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026

    ‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

    September 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif