कसारा घाटात भीषण अपघात, कंटेनर थेट खोल दरी कोसळला

5 जणांचा मृत्यू, 9 वर्षांच्या मुलाचाही मृत्यू

0

शहापूर, लोकशाही न्युज नेटवर्क

नवीन कसारा घाटात आज भीषण अपघात झाला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरचा चालकाचा ताबा सुटून कंटेनर थेट कसारा घाटातील खोल दरी कोसळला होता. कंटेनरमधून प्रवास करणारे पाच प्रवासी अडकून कडले होते.

मात्र यातील पाचही जणांचा मृत्यू झाला असून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. अजून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. यात एका लहान मुलाचाही समावेश आहे.

श्लोक जायभाय (वय 9, रा. नालासोपारा), अक्षय गुगे (वय 30, रा . नवी मुंबई ), अनिकेत वाघ (वय 21 रा .सिन्नर) या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यात मुंबईतील दोघांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन कसारा घाटातील बलगर पाॅईटजवळ हा भीषण अपघात झाला होता. कंटेनर ५ प्रवाशांना घेऊन नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होता. दरम्यान कंटनेर शहापूर तालुक्यातील कसारा घाटात आला होता. या ठिकाणी घाट रस्त्याला मोठा उतार आहे. त्यामुळे अंदाज न आल्यामुळे चालकाचा कंटेनरवरचा ताबा सुटला आणि कंटेनर थेट खोल दरीत कोसळला. यात कंटेनरमधील ५ ही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील दोघांचा समावेश असून एका ९ वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे.

दरम्यान अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केले आहे. यात आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बाहेर काढण्यात आलेले मृतदेह शवच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.