उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा

0

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची अमृता फडणवीस, मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे आणि त्यांची कलावती साळुंखे यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी मुख्य शासकीय महापूजा संपन्न झाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांची उपस्थिती होती.

कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून उत्तमराव माधवराव साळुंखे (वय ५८) व कलावती उत्तमराव साळुंखे (वय ५५, रा.शिरोडी खुर्द, फुलंबी जि. औरंगाबाद) या दापत्याची निवड करण्यात आली. यामुळे साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विठ्ठलाची शासकिय महापूजा करता आली आहे.

कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मानाच्या वारकरी म्हणून दर्शन रांगेतून माळकरी भाविकाची निवड केली जाते. यंदाच्या वर्षी हा उत्तमराव माधवराव साळुंखे (वय ५८) व कलावती उत्तमराव साळुंखे (वय ५५, रा.शिरोडी खुर्द, फुलंबी जि. औरंगाबाद) यांना मिळाला असून हे पती-पत्नी मागील ५० वर्षापासून विठुरायाचे यात्रा करत आहेत. त्यांना दोन मुले, २ मुली व नातवंडे असा परिवार  असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

आषाढी आणि कार्तिकीची पूजा करायला मिळाली ही पांडूरगांची कृपा, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापुजेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सपत्निक नामदेव वाड्याला भेट दिली. नामदेव महाराज मंदिराचं दर्शन घेतलं. यावेळी नामदेव महाराजांच्या 17 व्या वंशजांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नामदेव पगडी घालून सत्कार केला. यावेळी अमृता फडणवीस यांनी एक महिला आणि एका मुलीसोबत फुगडी खेळली. तर देवेंद्र फडणवीस यांनीही एका वारकऱ्यासोबत फुगडी खेळली.

Leave A Reply

Your email address will not be published.