Sunday, May 29, 2022

धक्कादायक.. माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीची आत्महत्या

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती 30 वर्षांची होती. सध्या बोअरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटलमध्ये मृतदेहाचे पोस्टमॉर्टम सुरु आहे.

- Advertisement -

बीएस येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे. सौंदर्या बंगळुरुच्या एमएस रमैया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती पती आणि सहा महिन्यांच्या बाळासोबत शहरातील माउंट कार्मेल कॉलेजजवळील एका अपार्टमेंटमध्ये राहत होत्या.

दोन वर्षांपूर्वीच सौंदर्याचे लग्न झाले होते. शुक्रवारी सकाळी तिचा मृतदेह आढळून आला असून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी बोरिंग रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बंगळुरुच्या हाय ग्राउंड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सौंदर्या ही येडियुरप्पा यांची पहिली मुलगी पद्मा यांची मुलगी होती. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांचे कुटुंबीय आणि प्रदेश भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे दिग्गज नेते येडियुरप्पा यांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह रुग्णालयात पोहोचले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसते.

 

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या