लोकशाही न्यूज नेटवर्क
वरणगाव – दारूचे व्यसन व पत्नी सोडून माहेरी गेल्याचे नैराश सतवत असल्याने कंरजी येथील तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारच्या रात्री घडली
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की बोदवड तालुक्यातील कंरजी पाचदेवळी येथील श्रावण रमेश बोदडे (३२) यांला लागलेले दारुचे व्यसन व पत्नी दोन वर्षांपूर्वी माहेरी निघून गेल्याचे मनात नैराश्यातून दि ८ रविवार रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घरा शेजारी वांजत्री बघण्यासाठी घरातील मंडळी गेल्याने घरात कोणी नसल्याचे पाहून आपल्या राहत्या घरात घराच्या लाकडी सरला नॉयलोनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे शेजारच्यानी घरात डोकावून पाहिल्याने उघडकीस आले
या बाबत सुधाकर रामचंद्र बोदडे यांच्या खबरी वरून वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पो हे कॉ मनोहर पाटील हे करीत आहे
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.