कपिल सिब्बल यांचा काँग्रेस पक्षाला रामराम

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या नेत्यांच्या जी-23 समूहातील कपिल सिब्बल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. 16 मे रोजीच आपण पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. सिब्बल यांना समाजवादी पक्षाने राज्य सभेची उमेदवारी दिली आहे. सिब्बल यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे देखील उपस्थित होते. मोदी सरकारचा विरोध करण्यासाठी एक आघाडी तयार व्हावी अशी इच्छा असून 2024 मध्ये मोदी सरकारच्या त्रुटी लोकांपुढे याव्यात यासाठी मी प्रयत्न करणार आहे असे सिब्बल यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.