नवसाचा कार्यक्रम आटोपून परतत असताना भीषण अपघात: तिघांचा मृत्यू, १७ जखमी

कन्नड घाटाच्या पायथ्याशी घडली घटना

0

नवसाचा कार्यक्रम आटोपून परतत असताना भीषण अपघात: तिघांचा मृत्यू, १७ जखमी

कन्नड घाटाच्या पायथ्याशी घडली घटना

चाळीसगाव | प्रतिनिधी

चाळीसगावजवळील कन्नड घाटाच्या पायथ्याशी भरधाव वेगात असलेल्या पिकअप वाहनाचा अपघात होऊन तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले. हा भीषण अपघात बुधवार, २ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता घडला.

पातोंडा गावातील महाजन कुटुंबीय श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे नवसाचा कार्यक्रम आटोपून परतत असताना हा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेले पिकअप वाहन (क्रमांक MH-19 BN-1947) वेगात घाटातून उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन नाल्यात उलटले.

या भीषण अपघातामध्ये नाना दामू माळी (वय ५८, रा. पातोंडा) , राहुल लक्ष्मण महाजन (वय ३५, रा. गुढे) , सावित्रीबाई मधुकर माळी (वय ६५, रा. पातोंडा) यांचा मृत्यू झाला तर निंबा काळू महाजन (वय ७०, रा. पोहोरे) ,संदीप संपत माळी (वय ३८, रा. पहाण), अनिकेत रमेश माळी (वय १६, रा. पातोंडा) , सुनीता रमेश माळी (वय २६, रा. पातोंडा) हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमींना तत्काळ धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले, तर उर्वरित जखमी चाळीसगाव येथे उपचार घेत आहेत.

या दुर्घटनेनंतर पिकअप चालक गोपीचंद निंबा माळी याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचे कारण वेगावर नियंत्रण नसणे व चालकाची निष्काळजीपणा असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.