Wednesday, August 10, 2022

कन्नड घाटावर भीषण अपघात; १०० फूट दरीत कोसळला ट्रक

- Advertisement -

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

कन्नड घाटात (Kannad Ghat) मोठा महादेव मंदिराजवळ रात्री १२.३० वाजेच्या सुमारास लाकडाने भरलेला ट्रक कन्नड घाटातून जाताना ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटून चालकासह ट्रक १०० फूट खोल दरीत कोसळला. यात चालक लाकडाखाली दाबला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. तर ट्रक दरीत कोसळताना क्लिनरने वेळीच उडी मारल्याने तो बचावला. महामार्ग पाेलिसांनी शाेध माेहिम राबवल्यानंतर सकाळी चालकाचा मृतदेह हाती लागला.

- Advertisement -

- Advertisement -

ब्रेक फेल झाल्याने अपघात 

आंध्र प्रदेशकडून चाळीसगावच्या दिशेने लाकडाने भरलेला ट्रक (एपी- १६, पीजी- ३५५३) येत होता. हा ट्रक कन्नड घाटात खाली उतरत असताना मोठा महादेव मंदिराजवळ ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाले. यामुळे चालक रामू सत्यम (वय ४१, रा. सदाशिवणी पालण, ता. सत्यमपल्ली, जि. खमम, तेलंगणा) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर हा ट्रक लाकडांसह जवळपास १०० फूट खोल दरीत कोसळला. ट्रक दरीत कोसळत असताना क्लिनरने उडी मारल्याने तो सुदैवाने बचावला. मात्र, त्याच्या पायाला जबर इजा झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, चालक रामू सत्यम हा ट्रकसह दरीत काेसळला.

घटनास्थळी माेठी वाहतूक काेंडी 

दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी माेठी वाहतूक काेंडी झाली हाेती. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश काळे, मिलिंद सोनवणे, पोलिस नाईक धनराज पाटील, नितीन आगोने, कॉन्स्टेबल गणेश पवार यांनी सहकार्य करुन ही वातूक काेंडी सुरळीत केली.

 थोडक्यात बचावला क्लिनर 

घाटात ट्रक कोसळल्याची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी क्लिनरला रूग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. तर जवळच्या हॉटेल चालकांकडून दोरखंड मागवून रात्री अंधारात खोल दरीत उतरून चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधारामुळे चालकाचा शोध घेता आला नाही. या दरम्यान घाटात वाहतूक काेंडी झाल्यानंतर ती सुरळीत करण्यात केली. या मदत कार्यात पाेलिसांनी सहकार्य केले.

चालक जागीच ठार

पुन्हा महामार्ग पोलिस व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी ज्या दरीत ट्रक कोसळला हाेता. तेथे चालकाचा शोध घेतला. चालक रामू सत्यम हा ट्रकच्या लाकडांखाली दाबल्याने ताे मृत अवस्थेत मिळून आला. क्रेनच्या सहाय्याने चालकाचा मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या