यावल तालुक्यात अतिवृष्टीमुळे कांदा व कापसाचे नुकसान…

0

 

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून, तो हवालदिल झाला आहे.

सदर नुकसानाचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी तालुक्यातून होतांना दिसत आहे. दि. ६ व ७ या दोन दिवसात बरसलेल्या मुसळधार पावसाने शेतातील वेचणीस आलेल्या उभ्या कपाशी पिकावर घरात येण्यापुर्वीच परतीच्या पावसाने नुकसान होण्याची भीती पसरली आहे. तसेच कांदा लागवड सुरू झालेली आहे या आधीच जास्तीच्या पावसाने कांद्याचे रोप कुजले आहे. आणि त्यामुळे लागवड झालेल्या कांद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here