जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
चितोडे वाणी समाज बऱ्हाणपूर संचलित श्री. कालिका पद्मावती देवी संस्थान वार्षिक स्थापना महोत्सवाचे दि. 3 व 4 जून रोजी आयोजन करण्यात आले असून या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
चितोडे वाणी समाजातर्फे या महोत्वाचे आयोजन करण्यात आले असून मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान येथील भक्त या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. वार्षिक स्थापना महोत्सवानिमित्त मंगळवार दि. 3 जून रोजी दुपारी 4 ते 5.30 या दरम्यान देवी सप्तशती पाठ, सायंकाळी 6 ते 7 दरम्यान समाज महिला मंडळाद्वारे भजन संध्या, सायंकाळी 7.30 वाजता आरती, 7.30 ते 8.30 दरम्यान महाप्रसाद, 8.30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व गरबा होणार आहे. बुधवार दि. 4 जून रोजी सकाळी 7.30 पद्मावती मातेची आरती, 8 वाजता ध्वज घेवून घोड्यावर बसण्याची बोली, सकाळी 8.30 वाजता मातीजींची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता शोभायात्रेचा समारोप, माताजींचे पूजन, मंदिर शिखरावर ध्वज चढविण्याची बोली, समाजातील अध्यक्षांचा सन्मान करण्यात येणार आहे. या नंतर बऱ्हाणपूर परिसरातील इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. माताजी पूजन, श्रृंगार, 56 भोग दर्शन व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संजय वाणी (8462938640) व दिलीप वाणी (9407189541) यांच्याशी संपर्क साधावा.
सहयोगासाठी आवाहन
मंदिराचे निर्माण व समाजातील विविध कार्यक्रम, अन्नदान यासाठी समाजातील दानशूर व्यक्तिंनी मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. ही मदत चितोडे वाणी समाज, भवन निर्माण यांच्या खात्यावर अदा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

