कला सिध्दी फाऊंडेशनतर्फे सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कला सिध्दी फाऊंडेशन तर्फे सामाजिक काम करणाऱ्या महिलांचा सन्मान जळगाव शहरातील महानगर पालिकेचे बेघर निवारा येथे करण्यात आला.

जळगाव जिल्ह्यात सामाजिक काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे त्यांच्या कार्याची माहिती जनतेला व्हावी या उद्देशाने शहरातील कला सिध्दी फाऊंडेशन चे वतीने जागतिक महिला दिवसांच्या पार्शवभूमीवर वेगवेगळ्या समामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या शहरातील सोळा महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महापौर जयश्री महाजन, डॉ. अनुराधा राऊत, डॉ. नेहा भंगाळे, गायत्री पाटील यांची उपस्थितीत होते.

महापौर जयश्री महाजन, डॉ. अनुराधा राऊत, डॉ. नेहा भंगाळे, गायत्री पाटील, उज्वला वर्मा, बेबीताई खोडपे, भावना चव्हाण, दिपाली कासार, कुसुम बिरारी, रेखा निकुंभ, डॉ. अपर्णा मकासरे, पद्मजा नेवे, मनीषा पाटील, भारती कुमावत, कोमल पाटील, वैशाली पाटील, निशा पवार, मनीषा धनगर इत्यादी महिलांचा सन्मान करण्यात आला.

शहरातील मनपाचे बेघर निवारा केंद्रात पार पडलेल्या या कार्यक्रमात मनपा अधिकारी गायत्री पाटील यांनी बेघर निवारा केंद्राची माहिती दिली. कोमल पाटील हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेच्या अध्यक्ष आरती शिंपी यांनी सूत्र संचालन केले व गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्य पद्मजा नेवे यांनी प्रार्थेने सह आपल मनोगत व्यक्त केले.

सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा कला सिध्दी फाऊंडेशनचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद असल्याचं मत महापौर जयश्री महाजन यांनी या वेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवाधर्म परिवाराचे चंद्रशेखर नेवे, बेघर निवारा केंद्राचे मनोज कुलकर्णी, संजय साळुंखे, सिध्दी शिंपी, आरोही नेवे यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.