काकणबर्डीत खंडोबा यात्रोत्सव उत्साहात…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मार्गशीर्ष मास प्रारंभ होताच पाचोरा तालुक्यात काकणबर्डी येथे चंपाषष्टी निमित्त खंडोबाच्या यात्रोत्सवाला सुरुवात होते. त्याच अनुषंगाने आज २९ नोव्हेंबर रोजी परिसरात यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला.

पाचोरा शहरापासून अवघ्या २ ते ३ कि. मी. अंतरावर व गिरड रस्त्याच्या कडेला खंडोबाचे मंदिर असून पौराणिक कथेच्या अख्ख्यायीकेनुसार याच टेकडीवर खंडोबाने दुसर्‍या विवाहावेळचे हाताचे काकण सोडले असल्याने या टेकडीला “काकणबर्डी” असे नाव पडल्याची कथा प्रचलित झाली. मार्गशीर्ष महिन्यात चंपाचष्टी निमित्त येथे मोठ्या भक्तीभावात भाविकांकडून “येळकोट येळकोट जय मल्हार” च्या गजरात हळद – खोबरे उधळून मल्हारी मार्तंडची तळी उचलून आरती व सदानंदाचा येळकोट – येळकोट चा गजर होतो. त्याचबरोबर भरीत व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवत मोठ्या भक्तिभावाने यात्रोत्सव साजरा करण्यात आला.

काकणबर्डीवर खंडोबाच्या दर्शनास तालुक्यासह जिल्हाभरातून भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी परिसरात लहानांसाठी खेळणी, पाळणे, हलवाईच्या हाँटेल्स, रसवंती यांची दुकाने थाटली होती. तसेच भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याची सोय व व्यवस्था शहरातील सामाजिक मंडळाकडून केली होती. यात्रेत अनेक खाद्य पदार्थांसह खंडोबावर उधळण्यासाठी हळद, खोबरे, झेंडूच्या फुलांच्या माळांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पाचोरा पोलिस यांचेसह पहुर व पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या पुरुष व महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here