a year and a half anniversary gifts best buy 5 off coupon code philadelphia airport parking coupon photo gifts mall
Monday, December 5, 2022

काय ती नदी, काय ते धरण, काय ते नाले, सगळीकडे ठणठणाट..

- Advertisement -

कजगाव ता. भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

सध्या इतरत्र बऱ्याच ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लावल्याने दिसून येत आहे.  जिल्ह्यात अनेक ठिकाणांची नाले, नद्या, धरणे ओरफ्लो झाल्याचे दिसून येतेय.  मात्र कजगाव व परिसरात पावसाने अजूनही जोर धरल्याचे दिसून येत नाही. कजगाव परिसरात एक दोन सोडले तर अजूनही जोरदार पाऊस पाहिजे त्या प्रमाणे झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

- Advertisement -

- Advertisement -

कजगावातील तितुर नदी अजूनही कोरडीकाठ आहे. गावातील लेंडी नाल्यासह बरड भागातील अनेक नाले व काही छोटेमोठे धरण ही पूर्णपणे कोरडेकाठ आहेत, तर कजगाव येथून जवळच असलेल्या व अनेक ठिकाणी पाणी पुरवठा होणाऱ्या सार्वे धरण पावसाळा दोन महिने झाल्यानंतर देखील कोरडेकाठ आहे. व त्यात मृत साठा सोडला तर अजूनही पाणी साठ्यात वाढ झालेली दिसून येत नाही. तर खाजोळा व भोरटेक (गजाननाचे) येथून वाहणारी गडद ही कोरडीकाठ दिसून येते.

“ह्या नदी नाल्यांचा ग्रामस्थांशी मोठ्या जिव्हाळ्याचा संबध येते. ह्या नदी नाले धरणावर अनेकांचे कृषिक्षेत्र अवलंबून आहे. ह्या मुख्य जलस्त्रोतात पाणी उपलब्ध नसेल तर भविष्यातील पाण्या संदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.  त्यामुळे कजगाव व परिसरातील जवळपास सर्वच नदी नाले धरण हे कोरडेकाठ असल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त आहे. त्यामुळे “काय ती नदी, काय ते नाले आणि काय ते धरण सगळीकडे ठणठणाटच ठणठणाट आहे” ..  अशा मुश्किली प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहेत

दरम्यान पाऊस काही दिवसांपासून जोरदार न बरसता रिपरिप सुरू आहे. त्यामुळे शेती कामांना मोठ्या प्रमाणावर अडचण येत आहे. शेती कामे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. शेतील तण दिवसेंदिवस वाढत असून काही ठिकाणी पीक छोटे आणि तण मोठे अशीच परिस्थिती दिसून येत आहे. त्यातच शेतातील तण काढण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणे मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. गावातील असंख्य शेतकरी अजूनही मजुरांना पायघड्या घालत असून मात्र मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांचा नाईलाज झाला आहे. त्यामुळे वाढती मजूर टंचाई बळीराजासाठी कमालीची डोकेदुखी ठरत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या