god's gift korean drama eng sub bridal shower ideas gifts for the guest free victoria's secret pink gift card pluralsight discount coupon gift delivery
Monday, December 5, 2022

ट्रॅक्टरची रिक्षाला धडक; रिक्षा चालकासह दोन महिला जखमी

- Advertisement -

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

कजगाव पारोळा मार्गावरील कजगावच्या उड्डाणपुलावर रिक्षा व ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह दोन महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना चाळीसगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

कजगाव येथील रहिवासी प्रविण सुपडु महाजन हे आपल्या रिक्षा क्रमांक एम.एच. १९ एक्यू ७४५५ ने शेतात जात असतांना कजगाव पारोळा मार्गावरील श्री. चक्रधारस्वामी रेल्वे उड्डाणपुलावर कोळगावकडुन येणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.१९ सी.झेड ६३०१ ने जोरदार धडक दिली.

या अपघात रिक्षा चालक प्रविण सुपडु महाजन यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. तर दिपाली प्रविण महाजन व सुनिता राजेंद्र वाघ या दोन महिलांना डोक्यास मार लागला आहे. त्यांना चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुलाच्या कठड्यामुळे रिक्षा व ट्रॅक्टर दोघं त्यात अडकल्यामुळे प्रवासी वाचले. अन्यथा दोन्ही वाहने सरळ पुलाच्या खाली गेली असती यात मोठी जीवितहानी झाली असती.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या