वरणगावला विजेच्या ठिणगीने कडब्याला आग ; शेतकऱ्याचे हजारोचे नुकसान
वरणगाव ;- शेतकऱ्याने गुरासाठी राखुन ठेवलेल्या नऊशे कडब्याच्या गंजावर विजेच्या तारा एकामेकावर घर्षण होऊन पडलेल्या ठिणगी पडून आग लागल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे आग विझविण्यासाठी अग्नीबंब आला खर मात्र त्या सोबत मनुष्य बळ नसल्याने शेतकऱ्यांनाच आग विझविण्याचा प्रयत्न करावा लागल्याने नगर परिषदेची यंत्रणा कुच कामी ठरली आहे
या बाबत माहिती अशी कि, शहरातील शेतकरी उमेश जनार्धन चौधरी यांच्या मलकीच्या गट नं १६४ मधील शेतात जनावरासाठी ९०० ज्वारी च्या कडब्याच्या पेंढ्या शेतात राखून ठेवलेल्या होत्या दि ११ मंगळवार रोजी सकाळच्या सुमारास त्या कडब्याच्या गंजाला अचानक आग लागल्यानंतर शेतात उभ्या गहु पिकाकडे आग पसरात असल्याचे शेतकऱ्यास दिसताच शेतकऱ्यानी आग विझविण्या साठी नगर परिषदे कडे अग्नी बंबला पाचरण करण्यात आले खरे मात्र चालका शिवाय त्या सोबत मनुष्यबळ नसल्याने शेतकऱ्यांलाच इतर शेतकऱ्याच्या मदतीने विझविली मात्र तो वर कडब्याचा कोळसा झाला होता तर हि आग शेतातून विजेच्या तारा गेलेल्या असून त्या वाऱ्यामुळे एकामेकाना घासल्या जावून त्यातून उडालेल्या ठिणगीतून आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे
या बाबत मंडळ अधिकारा व तलाठी यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला असून शेतकऱ्याचे पंचवीस ते तीस हजाराचे नुकसान झाले असल्याने अंदाज व्यक्त केला आहे

