Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भद्रावतीत एमडी ड्रग्जसह विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
    गुन्हे वार्ता

    भद्रावतीत एमडी ड्रग्जसह विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

    ५.२१ ग्रॅम मेफेड्रोन, मोबाईलसह मुद्देमाल जप्त : गुन्हा दाखल
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 29, 2026Updated:July 29, 2026No Comments137 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भद्रावती शहरात अमली पदार्थांविरोधातील कारवाईदरम्यान भद्रावती पोलिसांनी बसस्थानक परिसरातून एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत त्याच्याकडून ५. २१ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज पावडर आणि रिअलमी कंपनीचा मोबाईल असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७०२/२०२६ अन्वये अमली पदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) कायद्यातील कलम ८(क), २२(ब), २९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती बसस्थानक परिसरात एक मुलगा एमडी ड्रग्ज बाळगून असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकून संशयित विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून ५. २१ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज पावडर, ज्याची किंमत सुमारे १३ हजार रुपये आहे, तसेच १० हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत २३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात सपोनि विरेंद्र केदारे, सपोनि संजय मिश्रा, पोउपनि संतोष केदार, पोउपनि गजानन तुपकर, सफौ महेंद्र बेसरकर, पोलीस हवालदार अनुप आष्टुनकर, गोपाल आतकुरवार, पोलीस अंमलदार खुशाल कावडे, संतोष राठोड, योगेश घाटोळे तसेच चालक म. पो. अं. ६०२६ यांच्या पथकाने केली.

    अमली पदार्थांच्या तस्करी व विक्रीविरोधातील कारवाया पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा भद्रावती पोलिसांनी दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif