Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»कॅबप्रमाणेच आता एका क्लिकवर मिळणार रुग्णवाहिका!
    ताज्या बातम्या

    कॅबप्रमाणेच आता एका क्लिकवर मिळणार रुग्णवाहिका!

    rajelok11@gmail.comBy rajelok11@gmail.comOctober 3, 2026No Comments74 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राज्य शासनाचा मोठा निर्णय : रुग्णांची गैरसोय टळणार

    मुंबई : महाराष्ट्रात वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णवाहिका मिळवणे आता कॅब बुक करण्याइतके सोपे होणार आहे. राज्य परिवहन आणि आरोग्य विभागाकडून एका नाविन्यपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम सुरू असून, याद्वारे नागरिक मोबाईल ॲप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून आपल्या सर्वात जवळ उपलब्ध असलेली रुग्णवाहिका सहज शोधू आणि बुक करू शकतील.
    थेट स्थान आणि माहिती: या प्रस्तावित प्लॅटफॉर्मवर रुग्णवाहिकेचे लाईव्ह लोकेशन (थेट स्थान), पोहोचण्याची अंदाजित वेळ आणि प्रवासाचे सेवा शुल्क स्पष्टपणे दाखवले जाईल. आरोग्य आणि परिवहन विभागाचा संयुक्त उपक्रम: विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये नोंदणीकृत असणाऱ्या सर्व रुग्णवाहिकांचे तपशील या प्रणालीशी जोडले जातील. खाजगी चालकांचा सहभाग: खाजगी रुग्णवाहिका चालक आणि रुग्णालयांनाही या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचे नियोजन असून, त्यांच्यासाठी किमान वैद्यकीय सुविधा आणि मानके बंधनकारक केली जाऊ शकतात. रस्ते अपघाताच्या वेळी वेळेवर मदत न मिळाल्यामुळे अनेकदा जीव गमावावा लागतो. या समस्येवर मात करण्यासाठी ही यंत्रणा अपघातानंतरचा पहिला तास म्हणजेच ‌‘गोल्डन अवर‌’ लक्षात घेऊन विकसित केली जात आहे. वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्यास रुग्णाच्या जगण्याची शक्यता कैक पटीने वाढते. सध्या नागरिकांना आपत्कालीन मदतीसाठी विविध हेल्पलाइन किंवा वैयक्तिक चालकांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन वारंवार फोन करण्याची कटकट संपणार आहे. तसेच प्रवासादरम्यान रुग्णाला प्राथमिक उपचारांची सुविधा मिळावी, यासाठी डॉक्टर व परिचारिकांच्या उपलब्धतेवरही विचार सुरू आहे. हा प्रस्ताव सध्या नियोजन टप्प्यात असून लवकरच याची सविस्तर कार्यपद्धती जाहीर केली जाईल.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    rajelok11@gmail.com

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif