Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»हवामान»राज्यातील या भागांत जुलैच्या कोसळधार होणार सक्रीय
    हवामान

    राज्यातील या भागांत जुलैच्या कोसळधार होणार सक्रीय

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 3, 2025Updated:July 3, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यात पाऊस सक्रीय होणार आहे. पुणे शहरात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. मुंबईतील अनेक भागांत बुधवारी रात्रीपासून पाऊस सुरु आहे. या पावसाचा जोर गुरुवारी असणार आहे. पुणे आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, नाशिक या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भात अजूनही पाऊस सक्रीय झाला नाही. परंतु ६ जुलैपासून या भागांत पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

    काय म्हणाले होसाळीकर

    हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलैपासून महाराष्ट्रातील कोकण व घाट भागात पाऊस चांगला सक्रीय होणार आहे. तसेच विदर्भ व मराठवाडा काही भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता. यामुळे या भागात पावसाची आकडेवारी सुधाणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत ३ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात गुरुवारी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

    पुण्यात पाऊस सुरु : आरोग्याची काळजी घ्या

    गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु बुधवारी रात्री चांगला पाऊस झाला. पुणे शहरांसह घटमाथ्यावर पावसाने रात्री जोरदार हजेरी लावली. घटमाथ्यावर जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. रात्री 12 पासून 6451 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी जास्त केला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्र आणि डोंगरमाथा परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याबरोबरच माती, गाळ धरणात येत आहे. धरणाच्या पाण्यात गढूळपणा वाढल्याने नागरिकांकडून खराब पाणी येत असलेल्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी महापालिका आवश्यक काळजी घेत असून नागरिकांनीही पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

    नाशकात संततधार

    नाशिक जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा संततधार पाऊस सुरू झाल्याने गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला आहे. गंगापूर धरणातून 2133 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहर व मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात पावसाळ्याची चांगली सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, सध्या धरण 66.49 टक्के भरले आहे.

    #maharashtra Heavy Rain July Kolhapur Konkan meteorological department Nashik pune Rain Satara Senior Scientist K.S. Hosalikar Weather
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif