लोकशाही न्यूज नेटवर्क
न्याय देणाऱ्या न्यायाधीशांनीच लाच घेतल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. जामीन देण्यासाठी चक्क न्यायाधीशांनी ५ लाख रुपयांची लाच घेतल्याची बाब उघडकीस आली. याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी करवाई करत सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांवर गुन्हा दाखल केला. न्यायाधीशांना अटक करण्यासाठी उच्च न्यायालयाला पत्र पाठवण्यात आले असून हायकोर्टाच्या आदेशानंतरच न्यायाधीशांना अटक केली जाणार आहे.
जिल्हा आणि सत्र न्यायाधिश धनंजय निकम यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हाती आलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी न्यायाधिशांनी थेट लाच मागतिली. सातरा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांनी जामीन देण्यासाठी फिर्यादीकडून ५ लाख रुपयांची लाच मागितली. विशेष म्हणजे न्यायालयाच्या अवारातच न्यायाधीशांनी लाच मागितल्याची माहिती समोर आले आहे.
न्यायाधीशांनी फिर्यादीकडून न्यायालयाच्या आवारात लाच मागितली होती. लाचचे पैसे मध्यस्थींमार्फत घेण्यात आले होते. एका हॉटेलमध्ये लाचचे पैसे घेण्यात येत होते. त्यावेळी पोलिसांनी साफळा रचत पैसे घेणाऱ्या मध्यस्थींला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु मध्यस्थी पैसे तेथेच टाकून तेथून पळून गेले. दरम्यान याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.