Thursday, May 26, 2022

१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल २७८८ जागा

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

सीमा सुरक्षा दलात (बीएएसएफ) काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. या दलामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून, अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची २७८८ पदांसाठी ही भरती होणार आहे.

- Advertisement -

सरकारी व्यवस्थेत, सैन्यात नोकरी करण्यासाठी अनेक तरुणांची इच्छा असते. त्यामुळे संबंधित विभागांकडून भरतीच्या जाहिराती येण्याची ते वाट बघत असतात. सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफ भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचा भाग आहे. हे दल भारतीय सीमांच्या रक्षणाचे काम करत असते. १ डिसेंबर १९६५ रोजी या दलाची स्थापना करण्यात आली आहे. देशभरातली विविध कोपऱ्यांमधून आलेले अनेक तरुण आज या दलात आपली भूमिका बजावत आहेत.

देशाचे रक्षण करत आहेत. तसेच अनेकांना या दलात सहभागी होण्याची इच्छा असते. देशसेवा करण्याचे स्वप्न हे तरुण बघत असतात. त्यांना ही संधी मिळावी, या उद्देशाने केंद्रीय सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत भरतीची जाहिरात काढली आहे. तसेच बीएसएफच्या वेबसाइटवर त्याची सविस्तर माहिती जाहिर केली जाते. नुकतीच पुन्हा ही जाहिरात देण्यात आली असून २७८८ पदांसाठी भरती करणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. सर्व इच्छुक तरुणांसाठी बीएसएफची ही भरती उपयुक्त ठरणारी आहे.

बीएसएफच्या http://rectt.bsf.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज इच्छुक उमेदवारांना करता येणार आहे. वेबसाइटवर कॉन्स्टेबल एप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करुन अर्ज भरता येणार आहे. यासाठी शंभर रुपये शुल्क भरावा लागणार आहे. हे शुल्कदेखील ऑनलाइन माध्यमातून भरण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

इच्छुक उमेदावाराकडे मान्यताप्राप्त बोर्डाचे दहावी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच वय ऑगस्ट २०२१ रोजी उमेदवाराचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी आणि तेवीस वर्षांपेक्षा जास्त नसावे. २८ फेब्रुवारीपर्यंत या जागांसाठी अर्ज करता येणार आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या