मुंबईच्या लीलावती हॉस्पिटल येथे विविध पदांची भरती

0

मुंबईच्या लीलावती हॉस्पिटल येथे विविध पदांची भरती

मुंबई प्रतिनिधी लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वांद्रे (पश्चिम), मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रुग्णालयात पूर्णवेळ सोनोलॉजिस्ट तसेच कार्डिओलॉजी विभागातील निवासी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज १६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सादर करावेत. अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाइन (ई-मेलद्वारे) दोन्ही मार्गांनी पाठविता येतील. अर्ज मानव संसाधन विभाग, लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वांद्रे (पश्चिम), मुंबई – ४०००५० या पत्त्यावर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत आणि कोणत्याही प्रकारच्या त्रुटी टाळाव्यात, अशी सूचना रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.