Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ
    जळगाव

    शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ

    गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम : ८०० विद्यार्थ्यांसह ४०० कुटुंबांना अल्पदरात मिळणार शुद्ध पाणी
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 6, 2026No Comments60 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गांधी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून शिरसोली प्र.बो. येथे ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या सौ. माधुरी केला आणि त्यांच्या कन्या कु. मिहिका केला यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन पार पडले.

    मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्ते सुमित संघाई आणि सौ. माधुरी केला यांच्या दातृत्वातून हा उपक्रम साकारला आहे. विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमधील सुमारे ८०० विद्यार्थी तसेच परिसरातील ४०० कुटुंबे आणि ग्रामस्थांना या योजनेचा लाभ होणार आहे. ‘जीवनधारा’ योजनेच्या माध्यमातून दर तासाला सुमारे ५०० लिटर शुद्ध पेयजल उपलब्ध होणार असून ते अत्यल्प दरात ग्रामस्थांना मिळणार आहे.

    ग्रामीण भागात शुद्ध पेयजलाची उपलब्धता ही आजही मोठी गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन कु. मिहिका केला यांनी ‘जीवनधारा’ योजनेची संकल्पना आणि आवश्यकता मांडली. गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जैन इरिगेशनच्या तांत्रिक सहकार्याने ही योजना प्रत्यक्षात साकारली.

    शिक्षक दिनाचे औचित्य साधून विवेकानंद शाळेतील ज्येष्ठ शिक्षक व शिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कु. मिहिका केला यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक सामाजिक बांधिलकीचे संस्कार रुजविण्याचे आवाहन केले.

    गांधी रिसर्च फाउंडेशनच्या मार्गदर्शक सौ. अंबिका जैन यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ गांधीवादी अब्दुलभाई यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शुद्ध पाणी आणि आरोग्य यांचे महत्त्व समजावून सांगितले. ग्रामपंचायत सदस्य तसेच शिक्षकांनीही शुद्ध पेयजलाचा नियमित वापर करून आरोग्य जपण्याचे आवाहन केले. शिरसोली गावाची या उपक्रमासाठी निवड केल्याबद्दल दातृत्ववान मान्यवरांचे आभार व्यक्त केले. ‘जीवनधारा’ योजनेमुळे ग्रामस्थांना कमी खर्चात शुद्ध पाणी उपलब्ध होणार असल्याने पाण्यामुळे होणारे विविध आजार आणि साथीच्या रोगांना आळा बसण्यास मदत होईल. या शुद्ध पेयजल सयंत्राचे व्यवस्थापन विवेकानंद शाळेचे संचालक व शिक्षकवृंद करणार आहेत.

    यावेळी जैन इरिगेशनचे जलतंत्रज्ञ अभिजित जोशी, सुनील कोठाळकर, ग्रामपंचायत पदाधिकारी, विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गांधी रिसर्च फाउंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, विक्रम अस्वार, सुधीर पाटील तसेच विवेकानंद शाळेच्या शिक्षकांनी केले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif