dell refurbished laptops coupon dragon age origins xbox 360 gift giving birthday gifts for 21 year old man mam anti colic bottle coupon
Friday, December 2, 2022

अरे वा.. Jio चे महिनाभर चालणारे स्वस्त प्लान; ‘या’ मिळणार सेवा

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जिओ ही सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओ कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन प्लॅन लॉन्च करत असते. आता जिओने महिनाभर चालणारा जबरदस्त प्लॅन आणला आहे.

- Advertisement -

रिलायन्स जिओने अलीकडेच 30 दिवसांच्या वैधतेसह आपला नवीन अमर्यादित प्लॅन लाँच केला आहे. त्याची किंमत 259 रुपये आहे. प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि डेटा दिला जातो. कंपनीकडे आधीच 30 दिवसांच्या वैधतेसह काही योजना आहेत. आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या 30 दिवसांच्या सर्व प्लानची ​माहिती देणार आहोत.

- Advertisement -

जिओचा नुकताच लाँच झालेला हा प्लान महिनाभर चालतो. यामध्ये, 30 दिवसांसाठी दररोज 1.5 GB डेटा दिला जातो, जो एकूण 45 GB होतो. प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि 100 SMS/दिवस व्यतिरिक्त, Jio अॅप सदस्यत्व दिले जाते. कंपनीकडे असे तीन वर्क फ्रॉम होम डेटा पॅक आहेत जे 30 दिवस चालतात. त्यांची किंमत 181, 241 आणि 301 रुपये आहे.

181 रुपयांच्या पॅकमध्ये तुम्हाला 30 जीबी डेटा, 241 रुपयांच्या पॅकमध्ये 40 जीबी डेटा आणि 301 रुपयांच्या पॅकमध्ये 50 जीबी डेटा दिला जातो. वैधते दरम्यान तुम्ही हा डेटा कधीही वापरू शकता. प्लानमध्ये कॉल किंवा एसएमएस सारखी इतर कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.

296 च्या Jio फ्रीडम प्लानमध्ये 30 दिवसांची वैधता देखील मिळते. हा प्लान तुम्हाला 25 GB डेटा ऑफर करतो, ज्याच्या वापरासाठी कोणतीही दैनिक मर्यादा नाही. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि 100 SMS/दिवस व्यतिरिक्त, Jio अॅप सदस्यत्व दिले जाते.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या