जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
जळगाव शहरातील अनाथ व बेघर असलेल्या महिला व पुरुषांसाठी महानगरपालिकेने सुरू केलेल्या संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील वृद्धांच्या हातून गणपतीची महाआरती करून जिल्हा पेठ युवक मित्र मंडळांनी समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे.
बेघर व अनाथ असलेल्या वृद्धांना समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या अनेक उपाययोजना शासनाच्या माध्यमातून व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून नेहमी होत असतो त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा पेठ युवक मित्र मंडळाच्या वतीने गणपतीची महाआरती बेघर निवारा केंद्रातील वृद्धांच्या हातून केल्याने वृद्धही सुखावले.
जिल्हा पेठ युवक मित्र मंडळाने मागील 32 वर्षात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवून समाजापुढे नवीन आदर्श ठेवण्याचे काम नेहमी केले आहे आज रोजी महानगरपालिकेने उभारलेल्या संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील वृद्धांच्या हातून महाआरती करून समाजात चांगल्या रूढी आणि परंपरेचे सुरुवात केली आहे या महाआरतीने बेघर निवारा केंद्रातील वृद्धही सुखावले व भारावले. या निवारा केंद्रातील मीना वेताळ, रेखा भाटिया, मथुरा ठाकूर, रजनी भंगाळे, शांताराम राखोडे, सर्जेराव पाटील, झिंगा पाटील, महादू परदेशी, सगुना पवार, मालती बराटे या महिला व पुरुषांच्या हातून महाआरती करून त्यांना महाप्रसादही देण्यात आला.
जिल्हा पेठ युवक मित्र मंडळाच्या या कृतीने वृद्धही भारावले व त्यांचे डोळे आनंदाने पाणावले या कामी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निलेश देशमुख व प्रा. डॉ. नारायण खडके यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक सदस्य प्रा.संजीव पाटील, अभय सोमानी, किरण वायकोळे, अमोल पाटील, प्रदीप झोपे, नितीन देशमुख, कांचन पाटील, मिलिंद चौधरी, डॉ. अमित वर्मा, अतुल पारेख, कौस्तुभ चौधरी, धर्मेंद्र चंदनकर, दिनेश झोपे, हरीश नारखेडे, मधु पाटील, राजू झवर, सोनू भंगाळे, हितेंद्र सुरतवाला, मंडळाचे अध्यक्ष दीपक माळी, उपाध्यक्ष विकी सैंदाणे, सचिव गणेश कापडे, सल्लागार कैलास पाटील, ऍड. यशवंत महाजन, प्राध्यापक देवेंद्र मराठे, ईश्वर राजपूत, विजय देशमुख, उदय वराडे, मयूर सैंदाणे, सुनील सपके, सागर विसपुते, शंकर जावळे, प्रमोद सोनी आदींचे सहकार्य लाभले.