जळगाव-आज अनंत चतुर्दशी निमित्त सर्वत्र गणपती बाप्पांच्या भाविकांमध्ये उत्साह दिसून येत असून आज महापालिकेसमोर मानाच्या मनपा गणपतीच्या ढोल ताशा पथकात सहभागी होऊन स्वतः हातात ढोल घेऊन वाजवण्याचा आनंद जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला.
यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली दिसून आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा उत्साह प्रचंड दिसून येत होता.