भयंकर.. भीषण आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू

आकडा वाढण्याची शक्यता

0

उत्तरप्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उत्तर प्रदेशातील झाशीमधून धक्कादायक घटना समोर आलीय. महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजला शुक्रवारी रात्री आग लागली. या आगीत एनआयसीयू वॉर्डमध्ये दाखल असलेल्या 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आग मोठी असल्याने आता मृत्यू झालेल्या बालकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शॉर्ट सर्किट आणि नंतर एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मेडिकल कॉलेजमधील निक्कू (न्यू बॉर्न इंटेन्सिव्ह केअर युनिट) वॉर्डमध्ये सुमारे 12 मुलांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. वॉर्डात रात्री 11.40 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळतीये. अग्निशमन दलाच्या जवानांनी वॉर्डच्या खिडकीची काच फोडून आत पोहोचून गंभीररीत्या भाजलेल्या 8 मुलांना बाहेर काढलं आहे.

दरम्यान, अपघाताची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आयुक्त आणि डीआयजींना अपघाताची चौकशी करून १२ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री ब्रजेश पाठक आणि आरोग्य प्रधान सचिव झाशीला रवाना झाले आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.