हृदयद्रावक : तीन दिवसांची सुट्टी… दर्शनाचे स्वप्न… आणि एका संपूर्ण कुटुंबाचा अंत !

जयपूरजवळच्या भीषण अपघातात ५ जण ठार !

0

हृदयद्रावक : तीन दिवसांची सुट्टी… दर्शनाचे स्वप्न… आणि एका संपूर्ण कुटुंबाचा अंत !

जयपूरजवळच्या भीषण अपघातात ५ जण ठार !

लखनौ | प्रतिनिधी तीन दिवसांच्या सुट्टीचा बेत आखला होता पुतण्याचा वाढदिवस, देवदर्शन आणि मुलाचा मुंडन पण नियतीला काही औरच मंजूर होते . आनन्दाचे सर्व क्षण एकाच झटक्यात हिरावून घेतले. व्हेर्ना कारमधून दर्शनासाठी निघालेलं कुटुंब जयपूरजवळील मनोहरपूरच्या वळणावर काळाने घात केला आणि समोरून आलेल्या ट्रेलरने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील पाचही जणांना जगाचा निरोप घ्यावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली . अक्षरशः डोळे पाणावून सोडणाऱ्या या घटनेमुळे लखनौ शहरात रविवारी शोककळा पसरली .

 

कसा झाला अपघात
कुटुंब खातू श्याम मंदिराला भेट देण्यासाठी कारने निघाले होते. वाटेत त्यांची गाडी समोरून येणाऱ्या एका वेगवान ट्रेलरशी धडकली. ही टक्कर इतकी भीषण होती की ट्रेलर २० फूट खोल दरीत उलटला आणि कारचे तुकडे तुकडे झाले.सर्व प्रवासी गाडीतच अडकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कार कापून मृतदेह बाहेर काढले.

रायसर पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक रघुवीर सिंह यांनी सांगितले की, मृतांची ओळख पटली असून ते लखनऊच्या ठाकूरगंज पोलिस स्टेशन परिसरातील गौघाट चौकीचे रहिवासी आहेत. मृतांमध्ये कुटुंबप्रमुख सत्य प्रकाश (६०), त्यांची पत्नी रमा देवी (५५), मुलगा अभिषेक (३५), सून प्रियांशी आणि सहा महिन्यांची नात यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

सकाळी कुटुंबात नाश्ता सुरू असताना जयपूरहून फोन आला “अपघात झाला आहे, सगळे निघा.” हे ऐकून संपूर्ण घरात एकच आक्रोश झाला. अभिषेकचा मोठा भाऊ हिमांशू, काका चंद्रप्रकाश आणि इतर सदस्य जयपूरकडे रवाना झाले, पण जे दृश्य त्यांना पाहावं लागलं, ते शब्दांत मांडता येणं अशक्य होतं.

एकच कुटुंब… एकाच वेळी पाच अंत्ययात्रा

लखनौच्या गल्लीबोळांमध्ये रविवारी सायंकाळी एक वेगळाच सन्नाटा उतरला होता. घराघरातून एकच चर्चा “हे खरंच झालं का?” इंजिनिअर अभिषेक सिंह, त्यांची पत्नी आणि बँक मॅनेजर प्रियांशी, सहा महिन्यांची गोंडस श्री, वडील सत्यप्रकाश आणि आई रमादेवी असे पाच जीव एका क्षणात निघून गेले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.