Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    • दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नका!
    • आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला
    • अपुऱ्या पाणीपुरवठा योजना १५ दिवसांत पूर्ण करा!
    • मेट्रो-रेल्वे सेवा बंद ठेवल्याने सर्वोच्च न्यायालय नाराज
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    ताज्या बातम्या

    जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 15, 2026No Comments111 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यास दुसऱ्यांदा परवानगी नाकारल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी १९ सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, माझ्यासह ५० लोक आझाद मैदानावर उपोषणाला बसतील. माझ्यासोबत एक रुग्णवाहिका आणि दोन गाड्या असतील. रस्त्यात माझी प्रकृती बिघडल्यास उपचारासाठी रुग्णवाहिकेचा उपयोग होईल, तर माझ्या वाहनात काही बिघाड झाल्यास दुसऱ्या वाहनाचा वापर करता येईल. मात्र, काहीही झाले तरी १९ तारखेला आझाद मैदानावर जाणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे पाटील यांच्या याचिकेची दखल घेतली आहे. शांततेच्या मार्गाने उपोषण आंदोलन होत असेल आणि त्यातून सार्वजनिक हिताला बाधा येत नसेल, तर त्यासंदर्भात न्यायालयाने भूमिका स्पष्ट केली आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मुंबईत मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन करताना, प्रत्येकाने मुंबईला आलेच पाहिजे असे नाही, असेही सांगितले. तुमच्याकडे असलेले पैसे मुंबईतील खर्चासाठी राखून ठेवा; मी एकटाही मुंबईला जाण्यास समर्थ आहे, असे ते म्हणाले. आझाद मैदानावर उपोषणाला बसल्यानंतर पुढे काय होईल, ते पाहू. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोणतीही परिस्थिती आली तरी ती सहन करण्यास आपण तयार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणी, बीड आणि जालना जिल्ह्यांत बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आज अंतरवाली सराटी येथून जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून, ते बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्कामी राहणार आहेत. उपोषणाचा सतरावा दिवस असल्याने जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी पाणी आणि सलाईन घेण्यासही नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif