Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    संपादकीय

    जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 14, 2026No Comments95 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    राजधानी नवी दिल्लीतील जंतर-मंतर रोड हे सर्वांसाठी आंदोलन करण्याचे ठिकाण होते. परंतु जंतर-मंतर रोड आता कालपासून आंदोलन करण्यापासून वंचित राहणार आहे. तिथे कोणालाही आता आंदोलन करता येणार नाही, असा जीआर केंद्र सरकारने काढला आहे. त्याव्यतिरिक्त आंदोलनासाठी तीन जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यांपैकी एक म्हणजे रामलीला मैदान. रामलीला मैदान हे जंतर-मंतरपासून चार किलोमीटर अंतरावर आहे आणि ते मोठे ग्राउंड आहे. तेथे विविध कार्यक्रम होत असतात. तसेच त्याचे भाडे दिवसाला एक लाख रुपये इतके आहे. दररोज एवढे एक लाख रुपये भाडे देणे आंदोलकांना परवडणारे नाही. त्यामुळे ते आंदोलन करण्याच्या दृष्टीने योग्य जागा नाही. जंतर-मंतरवर सर्व सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे सर्व आंदोलकांना त्याचा फायदा होतो. १९९३ पर्यंत बोट क्लबवर आंदोलन व्हायचे. परंतु राम मंदिर आंदोलनानंतर बोट क्लब सोडून जंतर-मंतर रोड हे आंदोलन करण्यासाठी त्यावेळच्या पंतप्रधान नरसिंहराव सरकारने दिले होते. १९९५ पासून आतापर्यंत जंतर-मंतर रोडवर आंदोलने होत होती. आता मोदी-शहा यांनी जंतर-मंतर रोड आंदोलनापासून वंचित केले आहे. जंतर-मंतर रोड हे डी-नोटिफाय केले असले, तरी ते रद्द करावे म्हणून सर्व विरोधी पक्षांच्या वतीने त्याला विरोध केला जात आहे. जनता पार्टीच्या वतीने सुद्धा त्याला विरोध होत आहे. आज सीजेपीच्या वतीने सौरभदास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जंतर-मंतर रोडवरील बॅरिकेड्सवरून उड्या मारून हातात झेंडे घेऊन प्रदर्शन केले होते. म्हणून तिघांना व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पाच दिवस जेलमध्ये पाठविले आहे. आता त्यांना पाच दिवस काहीही करता येणार नाही. त्यामुळे जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. परंतु जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी नाही. सर्व बाजूंनी बॅरिकेड्स लावून ते बंद करण्यात आले आहे. तेथे जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. सर्व आंदोलकांना बॅरिकेड्सवर अडकवून, तेथे आंदोलनाला जाणाऱ्यांना अटक करून त्यांना ४० किलोमीटर अंतरावर नेऊन सोडण्यात आले. अशा प्रकारे आंदोलकांना अटक करून त्यांना दूर नेऊन सोडण्यात येत आहे. एकंदरीत, जंतर-मंतर रोड जरी पूर्णपणे बॅरिकेड्सने व्यापलेला असला, तरी आंदोलकांचे म्हणणे आहे की, जंतर-मंतरवर आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. तेथे आम्ही आंदोलन करणारच.

    आज सकाळी विविध संघटनांच्या वतीने आंदोलनाचे प्रदर्शन करण्यात आले. आज मेट्रो स्टेशन क्रमांक सहावरून मोठ्या प्रमाणात तरुण आंदोलनात घोषणा देत आले. “आमचा अधिकार आम्हाला परत द्या,” असे म्हणत हातात फलक घेऊन आंदोलन जंतर-मंतर रोडवर दाखल झाले. तेथे बॅरिकेड्सवर त्यांना अडकवण्यात आले. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना अटक करण्यात आली. सर्वांना अटक करून ४० किलोमीटर अंतरावर सोडण्यात आले. अशा प्रकारे आज सुद्धा जंतर-मंतरवर आंदोलन चालू होते. आता सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके हे आपल्या आजीचे निधन झाल्यामुळे गावाकडे गेले होते. ते परत नवी दिल्लीत आले आहेत. त्यांनी आपली पुढची स्ट्रॅटेजी जाहीर केलेली नाही. सौरभ दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांनी सकाळी जी रणनीती आखली, ती जर इतर आंदोलकांना कळविली असती, तर फार मोठा फरक पडला असता, असे इतर आंदोलकांचे म्हणणे होते. त्यावर अभिजीत दिपके म्हणतात, “अशा गोष्टी कळवायच्या नसतात. हे केले असते, तर पोलीस सतर्क झाले असते आणि आपला प्लॅन फिस्कटला असता. जंतर-मंतरवर जाऊन हातात झेंडे घेऊन ते फडकवायचे, असा एक कट रचला होता. ते शक्य झाले नसते. आता त्यांना अटक करण्यात आली आहे, हे आम्ही पाहून घेऊ.” एकंदरीत, जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्यांसाठी बंदी घालण्यात आली असली, तरी संपूर्ण देशभरात जंतर-मंतर निर्माण होईल आणि ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा येईपर्यंत आम्ही हे आंदोलन करणार आहोत. ज्ञानेश कुमार यांच्यानंतर देशाचे तानाशहा अर्थात हुकूमशहा नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा आम्ही घेणार आहोत, असेही ते म्हणाले. परवाच काँग्रेस पक्षासह सर्व विरोधी पक्ष आणि आईसा संघटनांच्या वतीने हक्का येथून सुप्रीम कोर्टावर जो मोर्चा गेला होता, तो प्रचंड मोठा होता. या मोर्चाचे नेतृत्व राहुल गांधींसह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केले होते. परंतु त्यांच्या मोर्चाचे नेतृत्व आईसा विद्यार्थी संघटनेच्या नेत्या नेहा बोरा यांनी करावे, असे राहुल गांधींनी सुचवले होते. नेहा बोरा यांनी या प्रचंड मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी सुप्रीम कोर्टाचे प्रमुख न्यायमूर्ती चंद्रकांत हे उपस्थित नव्हते. राजकीय मोर्चाला आपण जर समोर गेलो, तर राजकीय पक्षाला भेटल्याने टीका होईल, म्हणून ते भेटले नाहीत. त्यांनी मोर्चाच्या वतीने काही याचीका द्यायची असेल, तर द्यावी, असा त्यांना संदेश आला. त्यानंतर मोर्चाच्या वतीने १७ मागण्यांची एक याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. परंतु मोर्चा इतका मोठा होता की, मोर्चा पूर्णपणे यशस्वी झाला, असेच म्हणावे लागेल. या मोर्चाला शासनाने परवानगी दिली होती.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव

    November 8, 2026

    दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!

    November 7, 2026

    जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif