Sunday, November 27, 2022

जनसंवाद यात्रा समारोपाला राष्ट्रवादी दिग्गज नेत्यांची उपस्थिती

- Advertisement -

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

रोहिणीताई खडसे यांच्या संकल्पनेतून मुक्ताईनगर मतदार संघातील संपूर्ण 182 गावामध्ये प्रत्यक्ष जाऊन गोरगरीब जनतेच्या वैयक्तिक समस्यासह गावागावातील काही सामूहिक समस्या जाणून घेण्याच्या दृष्टीने आयोजित जनसंवाद यात्रा आता अंतिम टप्यात येऊन पोहचली आहे. कोणतीही निवडणूक नसताना सुरु असलेल्या या संवाद यात्रेला सर्वच गावातून ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

- Advertisement -

निमखेडी बुद्रुक परिसरात काँग्रेस विचारसरणीचा प्रभाव गेल्या अनेक वर्षांपासून आहे. देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे या परिसरावर विशेष प्रेम असल्याने काही कुटुंबाशी त्यांचे पारिवारिक संबंध निर्माण झाले होते. आता नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने या परिसरातून काँग्रेस -राष्ट्रवादीची मोठी ताकद आगामी निवडणुकीत रोहिणीताईच्या पाठीशी उभी राहणार आहे. नाथाभाऊंचा वारसा घेऊन रोहिणीताई वाटचाल करीत आहे, आगामी काळात रोहिणीताईंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून पवार साहेबांचे हात मजबूत करा. तसेच दि. 1 डिसेंबर रोजी या यात्रेचा समारोप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असून या भव्य दिव्य समारोप सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मुक्ताईनगरला हजारोच्या संख्येने उपस्थित रहा. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांनी यांनी निमखेडी बुद्रुक येथील सभेत केले.

यावेळी व्यासपीठावर आ. एकनाथराव खडसे, माफदा राज्याध्यक्ष विनोद भाऊ तराळ, यात्रा प्रमुख ईश्वरभाऊ रहाणे, निवृत्तीभाऊ पाटील, तालुकाध्यक्ष यु. डी. पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर, विकास पाटील, जि. प. सदस्य निलेश पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटील, यात्रासह प्रमुख रामभाऊ पाटील, डॉ. बी. सी महाजन, रणजित गोयंका, दिपक पाटील, सरचिटणीस रविंद्र दांडगे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा रंजनाताई कांडेलकर, सुभाष टोके, प्रविण कांडेलकर, नंदकिशोर हिरोळे, रसाल चव्हाण, सुनिल झांबरे, शांताराम पाटील, प्रविण दामोदरे, मुन्ना भाऊ बोडे, नितिन पाटील, अजाबराव पाटील, बाळा सोनवणे, महेश भोळे, विलास पुरकर, हरलाल राठोड, सचिन महाले, सुरेश तायडे, विशाल रोटे, हनिफ खान, मयुर साठे, राजु भडांगे, गजानन कवळे, सुशिल भुते, जिवन बोरनारे, चेतन राजपुत या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

जनसंवाद यात्रेच्या पस्तीसव्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड- मधापुरी- चारठाणा- निमखेडी बुद्रुक या गावात जाऊन रोहिणीताईंनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांमध्ये जाऊन महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. नाथाभाऊ आणि भैय्यासाहेब यांच्या मार्गदर्शनाने यापुढे विकासाला प्राधान्य देऊन मार्गक्रमण करीत आहे. किरकोळ मतांनी पराभव झाला असला तरी ज्या 90 हजार मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला, त्या मतदारासह जे शासकीय लाभापासून वंचित आहे. त्या उपेक्षित लोकांना मदतीचा हात देण्यासाठीच खऱ्या अर्थाने संवाद यात्रेचे आयोजन केल्याचे स्पष्ट करून यात्रेला माझ्या अपेक्षेपलीकडे जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचे रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केले.

यावेळी एकनाथराव खडसे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, गेले तीस वर्ष या मतदारसंघातील मतदारांनी मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली या कालखंडात अनेक विकास कामे मार्गी लावली. आधी मुक्ताईनगरवरून कुऱ्हा येथे येण्यासाठी रस्ता नव्हता आमदार झाल्यावर पहिल्यांदा मुक्ताईनगर ते कुऱ्हा डांबरी रस्ता बनवला. नदी नाल्यावर पुल निर्माण केले आता तर प्रत्येक गाव खेड्यांना चहुबाजूंनी डांबरी रस्त्यांनी जोडले. गावागावात शिक्षण, आरोग्य, गटारी, रस्ते यासाठी निधी उपलब्ध करून दिला. या भागातील शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर उपसा सिंचन योजनेसाठी घेतलेल्या कर्जाचे भूविकास बँकेचे बोजे होते ते कमी करण्यासाठी मदत केली. माझ्या विधानपरिषदच्या सहा वर्षे आमदारकीच्या काळात कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतापर्यंत आणण्यासाठी आगामी काळात पुर्ण ताकदीने पर्यंत करणार असल्याचे त्यांनी उपस्थितांना आश्वासन दिले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद होण्याचे आवाहन केले.

निमखेडी बुद्रुक येथील शांताराम कांडेलकर, सुभाष पाटील, सोपान नारखेडे, भगवान कोकाटे, श्रीकृष्ण महाराज, जितेंद्र चोपडे, योगेश चोपडे, शरद गाजरे, भागवत झनके, प्रल्हाद इंगळे, बाबुराव मुंडाले, सुरेश भोंगरे, रंगलाल रायपुरे, सुनिल कांडेलकर, जितेंद्र चौधरी, संदेश झोपे, हिरालाल तायडे, हिरालाल कांडेलकर, चांपलाल पटेल, दिपक पटेल, ज्योती लाल पटेल, निवृत्ती निंबोळकर, विलास भंगाळे, पंडित धात्रक, विकास पाटील, त्र्यंबक उबाळे
आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

मधापुरी येथील दिनु पवार, कंवरलाल पवार, निलेश भोसले, प्रविना पवार, डॅनी पवार, निलेश पवार, राजकुमार पवार, पप्पु पवार, बलीदास भोसले, प्रदिप पवार, रुपेश पवार, रवी भोसले, तपन पवार, विलास चव्हाण आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

बोदवड येथील सरपंच शालूताई तायडे, उपसरपंच इंदूबाई कोगळे, ज्ञानदेवराव मांडोकार, लहूभाऊ घुळे, वामन पाटील, प्रविण इखारे, योगेश इंगळे, पंजाबराव पाटील, कमलाकर तायडे, कैलास कोगळे, जानराव सोनवणे, विजय शिरसाठ, साहेबराव कोगळे, संजय बावस्कर, सुरेश इंगळे, रामजी मोरे, अमोल पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

इच्छापुर येथील अंबादास भोई, विष्णू भोई, संजय भोई, पुंडलिक पाटील, वासुदेव पाटील, दिलीप बेलदार, प्रमोद वेरूळकार, सुभाष सोनवणे, राजु भडांगे, रमेश वानखेडे, उज्वला बेलदार, कोकिळा बाई, रुपाली लोने, सुरेश वानखेडे, नामदेव पाटील, जनार्धन वानखेडे, तेजराव बोडे, शालिग्राम बेलदार, दिलीप बेलदार, दुर्गेश भडांगे, विष्णू बोडे, मयुर लोने, ऋषिकेश धात्रक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

चारठाणा येथिल श्रीराम सोनवणे, बाळाभाऊ सोनवणे, महेश भोळे, विकास पुरकर, विष्णू पुरकर, विलास पुरकर, राजु पिळोदकर, नरेंद्र पाटील, कमलाकर राणे, ज्ञानदेव कठोरकर, रवी निशाणकर, श्यामराव निशाणकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या