Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जामनेरमध्ये वाहनात गॅस भरत असताना गॅसहंड्यांचे मोठे स्फोट
    गुन्हे वार्ता

    जामनेरमध्ये वाहनात गॅस भरत असताना गॅसहंड्यांचे मोठे स्फोट

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 29, 2025Updated:September 29, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेरमध्ये वाहनात गॅस भरत असताना गॅसहंड्यांचे मोठे स्फोट

    एक जण गंभीर जखमी, शेळीचा मृत्यू

    जामनेर I लोकशाही न्युज नेटवर्क

    वाहनात गॅस भरत असताना शहरातील बोदवड रस्त्यावर  सकाळी नऊ ते दहा वाजेच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून एका शेळीचा जागीच मृत्यू झाला आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

    मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड रस्त्यावरील सलीम शेख यांच्या गॅरेजमध्ये अवैध गॅस रिफिलिंग सुरू असल्याचे समजते. सकाळच्या सुमारास वाहनांमध्ये गॅस भरत असताना गॅस लिकेज होऊन सात ते आठ गॅसहंड्यांचे मोठे स्फोट झाले. या स्फोटाच्या धक्क्याने ओमनी कार आणि दुचाकी जळून खाक झाल्या. तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

    या दुर्घटनेत परिसरात असलेली एक शेळी होरपळून जागीच मृत झाली. घटनेनंतर नागरिकांनी तातडीने जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. तसेच जामनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी स्वतः घटनास्थळी येऊन पाहणी करून माहिती घेतली.

    हे गॅरेज मोकळ्या जागेत असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनेची नोंद जामनेर पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Gas refilling Jamner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif