Tuesday, November 29, 2022

जामनेर तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

- Advertisement -

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

राज्यातील राजकीय उलथपालथ पाहता सध्या स्थितीत शिवसेनेचे आमदार व खासदार यांच्यासह बडे नेते शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत शिंदे गटात सामील झाले आहे. यामुळे एकाकी पडलेले उध्दव ठाकरे यांना बघुन शिवसैनिक अधिक जोरात कामाला लागलेले दिसत असून शिवसेना पक्ष वाढीसाठी वर पासुन तर तळागाळातील शिवसैनिकांनी पक्षाच्या वाढीचा चंग बांधलेला दिसत आहे. शिवसेना संपेल की काय असे चित्र दिसत असतांना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे पक्षाला अधिक बळकटी मिळण्यासाठी व पक्षात झालेली हानी भरुन काढण्यासाठी राज्यभर दौरा करीत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढीत आहे. हे दौरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सुरु असुन सर्व लोकांचे लक्ष यांच्या मतदारसंघांवर लागुन आहे.

- Advertisement -

- Advertisement -

यातच कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या जामनेर मतदारसंघात उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासुन इथला शिवसैनिक आक्रमक झालेला दिसत आहे.  बडे नेते सोडुन जात असतांंना जामनेर तालुका शिवसेनेत रोज नवतरुण प्रवेश करून शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून सामील होत आहेत. अशातच तालुक्यातील बेटावद बु. या  गावात पुर्ण बांधणी करीत शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले. अनेक तरुणांनी भगवा खांद्यावर घेत शिवसेनेत प्रवेश करीत आगामी काळात पक्षाला गतवैभव मिळवून दिल्याशिवाय हा शिवसैनिक शांत बसणार नाही असे यावेळी पक्षात प्रवेश करणाऱ्या नवंतरुणांनी आश्वासन दिले.

यावेळी शिवसेना आगामी काळात जामनेर तालुक्यात सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकीत भगवा फडकविल्याशिवाय हा शिवसैनिक शांत बसणार नाही. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना राज्याचा जो विकास केला आहे त्या कामाची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही जामनेर तालुक्यातील शिवसेना व त्यांचे सैनिक करणार आहे. तसेच येत्या काळात जामनेर तालुक्यातील राजकीय पक्षातील मातब्बर मंडळी ही लवकरच शिवसेनेत दाखल होणार असून राजकीय स्फोट होण्यास या तालुक्यातून सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी बोलताना दिली. तसेच ॲड. भरत पवार यांनी देखील उपस्थित कार्यकर्ते यांना मार्गदर्शन दिले. तसेच प्रत्येक गावात बूथ निहाय रचना करून १ बूथ २०  युथ या प्रमाणे रचना करीत प्रत्येक वार्डात काम करण्याची सुरुवात करण्याचे देखील यावेळी पवार यांनी सांगितले.

याप्रसंगी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा उपसरपंच शेळगाव निळकंठ पाटील, माजी युवा उपजिल्हाप्रमुख ॲड. भरत पवार, उपतालुकाप्रमुख अरुण पाटील, अशोक जाधव, कृष्णा चोरमारे, युवासेना तालुका अधिकारी विशाल लामखेडे, उपतालुका युवा अधिकारी रोहन राठोड, भुषण गरुड, मयूर पाटील, विकास अहीरे, सागर कोळी, गोपाल कोळी नांद्रा हवेली दांडगे, दिपक डिवरे, तुकाराम गोपाळ, मधुकर दारकोंडे, ज्ञानेश्वर कहाणे, तालुका प्रसिध्दी प्रमुख मुकेश जाधव यांच्यासह तालुक्यातील अनेक शिवसैनिक व गावातील स्थानिक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

बेटावद बु. येथील वि.का.सोसायटीचे सदस्य नितीन मराठे, वैभव घोडके, गणेश नेहे, पुरषोत्तम लंके, दिनेश पाटील, मनोज गरूड, जितेंद्र दंवडे, गोपाल दंवडे, रोहीत गरूड, दिपक थोटे, मधुकर वाघ, रामा पारधी, रोहित धनगर, विजय पाटील, रामा धनगर, पवन कान्हे, दिलीप काळे, नसिब बरडे, आदील शहा, शोकद तडवी, संतोष मिसाळ, गोपाल पावसे, आदेश इंगळे, गजानन राजपुत, रोहित गरूड, शुभम वैरी, लोकेश घोडके, सोपान पारधी, गुरु पारधी, गणेश आनकार, सुनील भोईटे, गणेश गरूड, ऋषीकेश पारधी, अजय लामखेडे, अर्जुन कान्हे, आबा लंके यांच्यासह अनेक तरूणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, घटनाकार  भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन करून गावात रँली काढण्यात आली.

यावेळी जुन्या शाखेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर कान्हे, मधुकर दारकोडे, अनिल नाईक, प्रकाश ठोबरे, गजानन लंके, रामचंद्र निळे, दिपक डिवरे, कैलास ठोबरे, भुषण गरूड, सुरेश पाटील, सोपान जाचक, शरीफ शहा यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन रोहन राठोड यांनी केले तर आभारप्रदर्शन भुषण गरूड यांनी केले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या