Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»क्रीडा»जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी
    क्रीडा

    जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 22, 2026No Comments92 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली जळगाव क्रिकेट लिग लिग-२०२६, जेसीएल टी -20 चा रोमांच शिगेला पोहचला आहे. मंगळवारी झालेल्या पहिल्या दोन सामन्यांत जळगाव कोगटा किंग्स आणि जामनेर सातपुडा हिरोज हा संघ विजयी झाला. त्यापूर्वी सोमवारी रात्री झालेल्या सामन्यात अमळनेर सुहांस जायंट्स संघाने विजय मिळवला होता. उपांत्यफेरी गाठवण्यासाठी आता जेसीएलच्या सर्व संघामध्ये चुरस निर्माण झाली आहे.

    मंगळवारी दुपारी जामनेर सातपुडा हिरोज आणि अमळनेर सुहांस जायंट्स या संघामध्ये लढत झाली. जामनेर सातपुडा हिरोज संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाचा हा निर्णय गोलदांजांनी यशस्वी ठरवला. अमळनेर संघाचा पहिला फलंदाज केवळ २ धावांवर बाद झाला. त्यानंतर ठराविक क्रमाने फलंदाज बाद होत गेले. त्यामुळे १०२ धावांवर सात फलंदाज तंबूत परतले होते. परंतु शुभम शर्माने एक बाजू लावून धरली होती. त्याने ४७ चेंडूत धुवांधार ६० धावा केल्या. रोहित भोईने १५ चेंडूत ३२ तर यशवंत शिंदे याने १६ चेंडूत २२ धावा करत संघाची धावसंख्या १५० च्या पुढे नेली. अमळनेर संघाचे सर्व फलंदाज १९.५ षटकांत १५२ धावांवर बाद झाले.

    विजयासाठी १५३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या जामनेर संघाची सुरूवात जोरदार झाली. केवळ ५.२ षटकांत एक गडी गमावत ५१ धावा केल्या. सामनावीर ठरलेल्या प्रद्युम महाजन याने अमळनेरच्या गोलंदाजांना फोडून काढले. त्याने ४२ चेंडूत ६९ धावांची धुवांधार खेळी केली. त्यामुळे जामनेरचा विजयाचा पाया पक्का झाला. ललित पाटील १७ धावा केल्या. रवींद्र आणि क्रिषी यांनी नाबाद पार्टनशीप करत संघाला विजय मिळवून दिला. रवीद्र याने २९ चेंडूत ३१ तर क्रिषी याने केवळ १६ चेंडूत ३० धावा केल्या. जामनेरने केवळ १७.४ षटकांत विजयी लक्ष्य गाठत ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. अमळनेरच्या शुभम शर्मा आणि सतीश चतुर्वेदी यांनी एक-एक फलंदाजाला बाद केले.

    मंगळवारी पहिला सामना जळगाव कोगटा किंग विरुद्ध रावेर रॉयल्स यांच्यात झाला. या सामन्याची नाणेफेक जेसीएल समिती सदस्य प्रशांत वीरकर यांच्या हस्ते झाली. या सामन्यात रावेर रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली. यश नहर (9), तौसीफ मिर्झा (0) आणि संदेश (9) लवकर बाद झाल्याने संघावर दबाव आला. त्यानंतर मोहम्मद आणि आदित्यही बाद झाल्यामुळे 67 धावांत पाच गडी बाद अशी बिकट अवस्थार रावेर रॉयल्सची झाली होती. मात्र, अशपाक शेख आणि प्रज्वल राजपूत यांनी डाव सावरला. अशपाकने 36 चेंडूत 45 धावा केल्या. तर प्रज्वलने 11 चेंडूत 17 धावा केल्या. त्यामुळे रावेर रॉयलने 20 षटकांत 143 धावांपर्यंत मजल मारली.

    जळगाव कोकटा किंग्सकडून राज बेलदार, मनिष चव्हाण आणि सागर भावसार यांनी एक-एक गडी बाद केला. कर्णधार जगदीश झोपे याने प्रभावी गोलंदाजी करत 15 धावा देत 2 बळी घेतले. बिपिन चावरे यांनीही 2 गडी बाद केले. 144 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या जळगाव कोगटा किंग्स संघाने 15.1 षटकांत 3 गडी बाद करत 146 धावा केल्या. ओम भोसले याने 46 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी केली. बिपिन चांगरे याने 25 चेंडूत 52 धावा करत संघाचा रनरेट वेगाने वाढवला. तोच सामनावीर ठरला.

    अमळनेर सुहांस जायंट्स आणि रावेर रॉयल्स यांच्यात २० एप्रिल रोजी रात्री सामना झाला. या सामन्यात अमळनेर संघाने 20 षटकांत 7 बाद 201 धावांचा डोंगर उभारला. रणजीत निकमने 55, मानव टीब्रेवाला 54 आणि ऋषी यादवने 37 धावांची उपयुक्त खेळी करत संघाला भक्कम सुरुवात दिली. प्रत्युत्तरात रावेर रॉयल्सचा डाव 20 षटकांत 7 बाद 164 धावांवर थांबला. संदेश सुरवाडेने 47 आणि तुषार चोरडियाने 46 धावांची झुंज दिली. गोलंदाजीत मोहंमद सैफने अचूक मारा करत 2 बळी घेतले आणि विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार रणजीत निकम याला प्रदान करण्यात आला. त्याने 55 धावा करत एक बळी घेतला.

    आजचे सामने (22 एप्रिल)
    दुपारी ३ वाजता : अमळनेर सुहांस जायंट्स xचाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स.

    सायंकाळी ७.३० वाजता : जळगाव कोगटा किंग x जामनेर सातपुडा हिरोज.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif